suryakumar-yadav twitter
क्रीडा

Suryakumar Yadav Statement: 'मी आधीच सांगितलं होतं..', ऑस्ट्रेलियाला धूळ चारताच कॅप्टन सूर्याचं लक्षवेधी वक्तव्य

India vs Australia, 2nd T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला आहे. दरम्यान या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Statement:

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ४४ धावांनी विजय मिळवला आहे. हा विजय मिळवत भारतीय संघाने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. या विजयासह भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव भारतीय संघातील खेळाडूंचं कौतुक करताना दिसून आला आहे.

या सामन्यात विजय मिळवल्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादवने रिंकू सिंग आणि संघातील खेळाडूंचं कौतुक करताना म्हणाला की,'माझे खेळाडू माझ्यावर जास्त दबाव येऊ देत नाही. त्यांना आपली जबाबदारी माहित आहे. मी त्यांना आधीच सांगितलं होतं,प्रथम फलंदाजीसाठी तयार राहा. मैदानावर दव होते. रिंकू जेव्हा गेल्या सामन्यात फलंदाजी करण्यासाठी आला होता, त्यावेळी त्याने संयम दाखवला होता. त्याने दमदार खेळ केला आहे' (Suryakumar Yadav Statement)

या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकअखेर ४ गडी बाद २३५ धावा केल्या.

भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने २५ चेंडूंचा सामना करत ५३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. तर ऋतुराज गायकवाडने ४३ चेंडूंचा सामना करत ५८ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इशान किशनने ५२ धावांची तुफानी खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादव १० चेंडूत १९ धावा करत माघारी परतला. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २३६ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला २० षटक अखेर ९ गडी बाद १९१ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू शॉर्टने प्रत्येकी १९-१९ धावांची खेळी केली. तर मार्कस स्टोइनिसने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. भारतीय संघाने या सामन्यात ४४ धावांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांना धक्का! ऋतुराज पाटील पराभवाच्या छायेत

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT