IND vs Aus 1st Test Team India Rohit Sharma Record Saam Tv
क्रीडा

Rohit Sharma Record : शतक ठोकताच रोहित शर्माने रचला इतिहास; असा कारनामा धोनी-कोहलीलाही जमला नाही

Satish Daud

Rohit Sharma Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना नागपुरात खेळवला जात आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येवर रोखल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त सुरूवात केली असून कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकावलं आहे. सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या रोहितने कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर १७१ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं.

रोहित शर्माचं हे नववं कसोटी शतक असून त्याच्या शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. दरम्यान, रोहित शर्माने शतक ठोकत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट कोहली टीम इंडियाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर गेल्या वर्षीच रोहितला भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाले होते. (Latest Sports Updates)

कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके

रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांनाही हा पराक्रम करता आला नाही. २०१७ मध्ये, रोहितने प्रथमच वनडे आणि टी-२० मध्ये कर्णधारपद भूषवले.

पदार्पणाच्या मालिकेत त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडेमध्ये २०८ धावा केल्या. याच दौऱ्यातील टी-२० सामन्यात रोहितने ११८ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितपूर्वी केवळ तीन कर्णधारांना ही कामगिरी करता आली आहे. यामध्ये श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांचा समावेश आहे. त्यात आता रोहित शर्माच्या नावाचाही समावेश झाला आहे.

दुसऱ्या दिवशी टीम इंडियाची जबरदस्त सुरूवात

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू तेव्हा कर्णधार रोहित शर्मासोबत रविचंद्रन अश्विन खेळपट्टीवर तंबू गाडून उभे होते. दोन्ही फलंदाजांना चांगली भागीदारी करून टीम इंडियाला (Team India) चांगली आघाडी वाढवायला मदत केली. मात्र, लंच ब्रेक जवळ असतानाच ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपट्टू मर्फीने ही जोडी फोडली. आश्विन २३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कोहली आणि सूर्यकुमारलाही मर्फीने झटपट माघारी पाठवले.

भारताची पहिल्या डावात आघाडी

उपहारानंतर मर्फीच्या पहिल्याच चेंडूवर त्याने किंग कोहलीला बाद केले. कोहली १२ आणि सूर्यकुमार फक्त ८ धावा काढून माघारी परतला. एकवेळ भारताची स्थिती ५ बाद १६८ झाली होती. मात्र, त्यानंतर आलेल्या रवींद्र जडेजाने रोहितची चांगली साथ दिली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या ५ बाद २०९ धावा झाल्या होत्या. भारताने आपल्या पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी घेतली असून कर्णधार रोहित शर्मा नाबाद १०८ आणि रवींद्र जडेजा नाबाद २७ धावांवर खेळत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT