Rohit Sharma Century:हिटमॅन इज बॅक! तब्बल १६ महिन्यांनंतर झळकावले कसोटीतील पहिले शतक

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देखील त्याने कसोटीतील अव्वल गोलंदाज पॅट कमिन्सला षटकार मारत जोरदार सुरुवात केली.
Rohit Sharma Century
Rohit Sharma CenturySAAM TV
Published On

IND VS AUS Rohit Sharma Century: भारत आणि ऑस्ट्रेलिया(India vs Australia) या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिला दिवस भारतीय संघाच्या नावे राहिला. तर दुसऱ्या दिवशी देखील भारतीय संघाने जोरदार सुरुवात केली आहे.

या सामन्यातील पहिल्याच डावात भारतीय कर्णधार रोहित शर्माने जोरदार शतक झळकावले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली होती.

तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देखील त्याने कसोटीतील अव्वल गोलंदाज पॅट कमिन्सला षटकार मारत जोरदार सुरुवात केली. त्याने १७१ चेंडूंचा सामना करत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने १४ चौकार आणि २ षटकार मारले.

शतकाची प्रतीक्षा अखेर संपली...

रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावत जोरदार पुनरागमन केले होते. मात्र कसोटी क्रिकटमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. गेल्या २ वर्षांपासून त्याला कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावता आले नव्हते. (Latest Sports Updates)

Rohit Sharma Century
IND VS AUS:अश्विनचा नादच करायचा नाय !१ गडी बाद करताच उद्ध्वस्त केले हे '३' मोठे विक्रम

कसोटीतील शेवटचे शतक त्याने ४ सप्टेंबर २०२१ रोजी इंग्लंड संघाविरुद्ध झळकावले होते. मात्र आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावत त्याने जोरदार पुनरागमन केले आहे. त्याचा हा फॉर्म भारतीय संघासाठी येणाऱ्या सामन्यांमध्ये फायदेशीर ठरू शकतो.

दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची चांगली सुरुवात..

ऑस्ट्रेलियाचा डाव स्वस्तात गुंढाळल्यानंतर भारतीय संघाला आघाडी घेण्याची सुवर्णसंधी आहे, याचा फायदा घेत, भारतीय संघाने पाहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.

Rohit Sharma Century
IND VS AUS 1st Test: भारतीय स्पिनर्स समोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे सरेंडर!अवघ्या १७७ धावांवर आटोपला पहिला डाव

मात्र केएल राहुल २० धावांवर माघारी परतला. त्यानंतर अश्विनने रोहितची साथ देत चांगली भागीदारी केली. अश्विनने २३ धावांचे योगदान दिले. तर चेतेश्वर पुजारा ७ धावांवर माघारी परतला. तर विराट काेहली १२ धावा करत माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com