team india twitter
Sports

IND vs AFG: भारत- अफगाणिस्तान लढतीत हे ५ खेळाडू टीम इंडियासाठी ठरु शकतात गेमचेंजर

Players To Watch Out In IND vs AFG Match: भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघांमध्ये सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत.

Ankush Dhavre
team india

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील खऱ्या आव्हानाला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने साखळी फेरीत शानदार कामगिरी केली.

team india

आतापर्यंत खेळलेल्या ४ पैकी ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर १ सामना हा पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता.इथून पुढे होणारा प्रत्येक सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

team india

पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. अफगाणिस्तानने बलाढ्य संघांना पराभूत करत सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ देखील भारतीय संघाला कडवी झुंज देऊ शकतो. दरम्यान ५ खेळाडू आहेत,जे भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावू शकतात.

virat kohli

विराट कोहली

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत अजूनही सुरु गवसलेला नाही. सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. विराट न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसून आला होता. मात्र अफगाणिस्तानविरुद्ध होणारा सामना हा बारबाडोसच्या मैदानावर होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे या सामन्यात तो धावांचा पाऊस पाडू शकतो.

rohit sharma

रोहित शर्मा

विराट कोहलीप्रमाणेच रोहित शर्मालाही अजूनही सुर गवसलेला नाही. त्याने आयर्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. मात्र त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो संघाला चांगली सुरुवात करुन देऊ शकतो.

jasprit bumrah

जसप्रीत बुमराह

भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चांगल्याच रिदममध्ये आहे. त्याला अमेरिेकाविरुद्ध झालेल्या सामन्यात एकही गडी बाद करता आला नव्हता. तर पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने निर्णायक वेळी मोहम्मद रिझवानला बाद केलं होतं.

arshdeep singh

aaअर्शदीप सिंग

अर्शदीप सिंगनेही भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. त्याने सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय संघाला विकेट्स काढून दिल्या आहेत.

team india

शिवम दुबे

शिवम दुबेने अमेरिकेविरुद्धच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने ३१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. या सामन्यातही त्याच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिला; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT