IND A vs AUS A: भारतीय संघाला काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडकडून ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. आता हा पराभव विसरुन भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे.
मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये रंगणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय अ आणि ऑस्ट्रेलिया अ या दोन्ही संघांमध्ये अनधिकृत कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय अ संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.
या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही.
अवघ्या ११ धावांवर संघातील ४ फलंदाज तंबूत परतले. भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी अभिमन्यू ईश्वरन आणि केएल राहुलची जोडी मैदानात आली होती. मात्र या जोडीला हवी तशी सुरुवात करुन देता आली नाही. केएल राहुल ४ तर अभिमन्यू ईश्वरन शून्यावर माघारी परतला.
भारतीय संघाचं टेन्शन वाढणार
रोहित शर्माचा बॅकअप म्हणून अभिमन्यू ईश्वरन किंवा केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते. रोहत मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीतून बाहेर होऊ शकतो, अस म्हटलं जात आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी अभिमन्यू ईश्वरन किंवा केएल राहुलपैकी तएकाला संघी मिळू शकते. मात्र त्याचा हा फॉर्म पाहता,नक्कीच भारतीय टीम मॅनेजमेंटचं टेन्शन वाढलं असेल.
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरु असलेल्या मालिकेसाठी असा आहे भारतीय अ संघ:
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), मुकेश कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुश कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, केएल राहुल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.