IPL 2022 saam tv
क्रीडा

IPL PlayOff 2022 : मैदानात पाऊस पडल्यावर कोण जाणार फायनलमध्ये ? वाचा सविस्तर नियमावली

यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या पर्वात चार संघानी सर्वस्व पणाला लावून प्ले ऑफच्या शर्यतीत विजय संपादन केलं आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या पर्वात (IPL 2022) चार संघानी सर्वस्व पणाला लावून प्ले ऑफच्या शर्यतीत विजय संपादन केलं आहे. लखनऊ, गुजरात, राजस्थान आणि बंगळुरुला चॅम्पियन होण्याची संधी आहे. उद्या मंगळवारी २४ मे रोजी पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. तर २९ मे ला आयपीएल २०२२ ची फायनल (ipl final match) होणार आहे. दरम्यान, प्ले ऑफच्या सामन्यांसाठी जागाही बदलली आहे. चारही सामने कोलकता आणि अहमदाबाद मध्ये खेळवले जाणार आहे. अशातच आता आयपीएलच्या नियमांमध्येही (ipl rules) काही बदल करण्यात आले आहेत. आयपीएल २०२२ च्या प्ले ऑफच्या सामन्यांमध्ये जर पाऊस पडला, खेळासाठी (Rain) पोषक हवामान नसेल किंवा अन्य काही कारणामुळं फायनलचा सामना होऊ शकला नाही, तर यंदाच्या आयपीएलचा विजेता कोण होणार, याबाबतची माहिती समोर आलीय.

सुपर ओव्हर ठरवणार विजेता

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलकडून असं सांगण्यात आलंय की, जर प्ले ऑफमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास सुपर ओव्हरच्या मदतीनं विजयी संघ ठरवला जाणार आहे. हा नियम प्ले ऑफच्या क्वालीफायर-१, एलिमिनेटर आणि क्वालीफायर-२ साठी लागू असणार आहे. कारण या सामन्यांसाठी कोणताही रिझर्व डे नसणार आहे. जर या तिनही सामन्यांमध्ये सुपर ओव्हर टाकण्याची परिस्थिती निर्माण न झाल्यास, संघाच्या गुणातालिकेतील स्थानावरुन फायनलिस्टची निवड करण्यात येणार आहे. आयपीएल २०२२ फायनल २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर २९ मे ला सामना झाला नाही, तर ३० मे ला फायनलचा सामना खेळवला जाईल. दरम्यान,फायनलचा सामना सायंकाळी ७.३० ऐवजी ८ वाजता खेळवला जाणार आहे.

प्ले ऑफमध्ये पोहचलेल्या संघांची गुणतालिकेतील स्थिती

•    गुजरात टायटन्स 20 गुण, 0.316 नेटरनरेट

•    राजस्थान रॉयल्स- 18 गुण, 0.298 नेटरनरेट

•    लखनऊ सुपर जायंट्स- 18 गुण, 0.251 नेटरनरेट

•  रॉयल चॅंलेजर्स बॅंगलोर - 16 गुण, -0.253

एवढ्या ओव्हर कमी करु शकतात

आयपीएलच्या नियमावलीनुसार, प्रत्येक प्ले ऑफ सामन्यासाठी गरजेनुसार प्रत्येक संघाच्या सामन्यासाठी कमीत कमी पाच ओव्हर्स कमी केल्या जाऊ शकतात. नियमानुसार, जर एलिमिनेटर आणि प्रत्येक क्वालीफायर मध्ये अतिरिक्त वेळ दिल्यानंतरही पाच षटकांचा सामना झाला नाही, तर परिस्थितीनुसार संबंधित एलिमिनेटर आणि क्वालीफायर सामन्यातील विजेता सुपर ओव्हरच्या माध्यमातून ठरवला जाणार आहे. जर सुपर ओव्हर मध्येही सामन्याचा निकाल लागला नाही, तर ७० सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असणाऱ्या संघाला प्ले ऑफमध्ये किंवा फायनलच्या सामन्यांमध्ये विजेता घोषीत केलं जावू शकतं.

जर २९ मे ला फायनल सुरु झाली आणि त्या दिवशी एक चेंडू जरी फेकला गेला, तर पुढच्या दिवशी सामना जिथे थांबवला होता तेथूनच सुरु करण्यात येईल.जर पावसाने खोडा घातला आणि नियमीत वेळेनुसार सामना न झाल्यास आयपीलचा २०२२ चा विजेता सुपर ओव्हरच्या माध्यमातून ठरवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT