Women's World Cup: India won against Bangladesh
Women's World Cup: India won against Bangladesh saam tv
क्रीडा | IPL

World Cup: टीम इंडियाचा बांग्लादेशवर दणदणीत विजय; यास्तिका, स्नेहची धडाकेबाज कामगिरी

साम न्यूज नेटवर्क

दिल्ली : महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत (ICC Women's World Cup 2022) आज टीम इंडियानं (India) बांगलादेश (bangladesh) संघावर ११० धावांनी दणदणीत विजय (victory) मिळविला आहे. बांगलादेश संघापुढे २३० धावांचे आव्हान हाेते. भारतीय गाेलंदांजी पुढं ते त्यांना गाठता आले नाही. (icc womens world cup cricket latest marathi news)

विजयासाठी २३० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा संघास ११९ धावांतच भारतीय गाेलंदाजांनी गारद केले. आजच्या विजयात गाेलंदाज स्नेह राणा (sneh rana) आणि झुलनं गाेस्वामी (jhulan goswami) यांचा माेलाचा वाटा ठरला आहे. विश्व करंडक क्रिकेट (world cup) स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्यासाठी आजचा विजय भारतीय संघास महत्वाचा ठरला आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत ५० षटकांत सात बाद २२९ धावा केल्या. यामध्ये स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५ षटकात ७४ धावांची भागीदारी केली. स्मृती ५१ चेंडूत ३० धावा करून बाद झाली. तिला नाहिदा अख्तरने बाद केले. पुढच्याच षटकात रितू मोनीने शेफाली वर्मा आणि मिताली राज यांना सलग दोन चेंडूंवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शेफालीने ४२ चेंडूत ४२ धावा केल्या. मिताली पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाली.

यास्तिकाने अर्धशतक झळकावले

यास्तिका भाटियासह हरमनप्रीत कौरने पाच चेंडूत तीन गडी गमावल्यानंतर संघाचा डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी केली. फरझाना हकने धावबाद केल्यावर हरमनप्रीत येथे आणखी एक चांगली खेळी खेळू शकेल असे वाटत होते. हरमनप्रीतला केवळ १४ धावा करता आल्या. यानंतर यास्तिकने ऋचा घोषसोबत पाचव्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. रिचाने ३६ चेंडूत ३६ धावा केल्या. यादरम्यान यास्तिकाने आपले अर्धशतक पूर्ण केले. ५० च्या वैयक्तिक धावांवर ती नाहिदा अख्तरच्या हातून रितू मोनीकरवी झेलबाद झाली.

त्यानंतर पूजा वस्त्राकर आणि स्नेह राणा यांनी शेवटच्या षटकात चांगली फलंदाजी केली. दोघांनी सातव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. पूजा ३३ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने नाबाद ३० धावा करून नाबाद राहिली. त्याचवेळी स्नेह राणाने २३ चेंडूत २७ धावा केल्या. झुलन गोस्वामी दोन धावांवर नाबाद राहिली. बांगलादेशकडून रितू मोनीने तीन आणि नाहिदा अख्तरने दोन गडी बाद केले.

स्नेहसह झुलन आणि पूजाची ही तगडी गोलंदाजी

बांगलादेशच्या डावाकडे पाहता केवळ पाच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. सलमान खातूनने सर्वाधिक ३२ धावा केल्या. लता मंडलने २४, मुर्शिदा खातून १९, रितू मोनीने १६, जहाँआरा आलमने नाबाद ११ धावा केल्या. भारताकडून स्नेह राणाने चार गडी बाद केले. याबराेबरच पूजा वस्त्राकर आणि झुलन गोस्वामी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: आपल्या हाताच्या बोटाचं आणि आरोग्याचे संबंध काय?

Today's Marathi News Live : जोधपूरमध्ये ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश, साकीनाका पोलिसांची कारवाई

Tulsi Vastu Tips: घराच्या या दिशेला तुळस ठेवल्याने होईल आर्थिक भरभराट

Akola News : अकोला जिल्ह्यात वादळी तडाखा; पपई, केळीच्या फळबागा भुईसपाट

Viral Video: रीलसाठी स्टंटबाजी! तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा; बंदुक हातात घेतली अन्.... संतापजनक VIDEO

SCROLL FOR NEXT