Indian woman team Saam tv
Sports

ICC Women's T20 World Cup 2024 : बांगलादेशामध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्डकप स्पर्धा आयोजनाला ब्रेक, हिंसाचारानंतर ICC काय निर्णय घेणार?

ICC Women's T20 World Cup 2024 in Bangladesh : बांगलादेशामध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेला ब्रेक लगला आहे. बांगलादेशातील हिंसाचारानंतर ICC काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचार उफाळून आला आहे. या हिंसाचाराच्या घटनेनंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. भारतानंतर त्या लंडनमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान, बांगलादेशात ऑक्टोबरमध्ये महिला टी२० वर्ल्डकप स्पर्धा आयोजित आहे. या आयोजनानुसार, बांगलादेशात ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरपर्यंत महिला टी२० वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, बांगलादेशात हिंसाचार उफाळून आल्याने आयसीसी काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

बांगलादेशच्या हिंसाचारामुळे पंतप्रधान शेख हसीना या राजीनामा देऊन देश सोडावा लागला. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशात तेथील लष्कर अंतरिम सरकार स्थापन करून सत्ता ताब्यात घेणार आहे. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू झाला आहे.

बांगलादेशातील हिंसाचारानंतर स्पर्धेच्या आयोजनाबाबत काय निर्णय घ्यावा, याबाबत आयसीसी विचार करत आहे. आयसीसी बोर्डाच्या एका सदस्याने म्हटलं की, 'आयसीसीजवळ सर्व देशात एक स्वतंत्र्य सुरक्षा यंत्रणा असते. या यंत्रणेच्या माध्यमातून लक्ष दिलं जातं. स्पर्धा सुरु होण्याआधी सात आठवडे बाकी आहेत. हिंसाचारानंतरही स्पर्धेचं बांगलादेशातच आयोजन केलं जाईल का, यावर आता मत व्यक्त करणे, घाईचे होईल'.

आयसीसीच्या सूत्रांनुसार, मार्च २०२२ साली श्रीलंकेत हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी आंदोलक माजी राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांच्या घरावर धावून गेले होते. या हिंसाचारानंतर काही महिन्यांनी ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. तर महिला वर्ल्डकप स्पर्धेचे सामने ढाका आणि सिलहट येथे खेळले जाणार आहे.

दरम्यान, भारतीय नागरिकांना बांगलादेशात न जाण्याचा सल्ला दिला आहे. बीसीसीआय संस्था देखील केंद्र सरकारचा सल्ला पाळत आली आहे. त्यामुळे आयसीसी महिला टी२० वर्ल्डकप स्पर्धेबाबत काय निर्णय घेणार, यासाठी काही दिवस थांबावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vanshawal: जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळ हवी? पण वंशावळ म्हणजे काय अन् कशी काढायची?

Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी घातक? जडू शकतात हे गंभीर आजार

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गात समावेश करा, नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

SCROLL FOR NEXT