ICC Womens T20 World Cup Team India Saam TV
Sports

Womens T20 World Cup : टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये धडक; आयर्लंडवर ५ धावांनी मिळवला विजय, पाकिस्तान स्पर्धेबाहेर!

या विजयासह भारताने आपलं सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं. भारताच्या विजयामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा पूर्णपणे धुसर झाल्या आहेत.

Satish Daud

ICC Womens T20 World Cup Team India : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत सोमवारी टीम इंडिया आणि आयर्लंड संघात अतिशय रंगतदार सामना झाला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंड ५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने आपलं सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं. भारताच्या विजयामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा पूर्णपणे धुसर झाल्या आहेत. (Latest Sports Updates)

सेमीफायनची फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला आयर्लंड विरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा होता. अतिशय महत्वपूर्ण सामन्यात भारताने (Team India) प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडसमोर विजयसाठी २० षटकांत ६ बाद १५५ धावांचं उभं केलं. या धावाचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरूवात अतिशय खराब झाली.

भारताने पावरप्लेमध्ये आयर्लंडला दोन जबर धक्के दिले. त्याचाच फायदा भारताला झाला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्यात आयर्लंडला ८.२ षटकांत २ बाद ५४ धावाच करता आल्या. पावसामुळे जेव्हा खेळ थांबला तेव्हा भारत डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी आयर्लंडच्या पुढे होता. याचाच फटका आयर्लंड संघाला बसला. अशा पद्धतीने भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

भारतीय संघाकडून स्मृती मंधानाने सर्वाधिक धावा केल्या.मंधानाने ५६ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ८७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. त्याचबरोबर तिने शफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी केली. आयर्लंड संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार लॉरा डेलेनीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याचबरोबर ओर्ला प्रेंडरगैस्टने दोन आणि आर्लेन केलीने एक विकेट घेतली.  (Latest Marathi News)

दरम्यान, १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, आयर्लंडने ८.२ षटकांत दोन गडी गमावून ५४ धावा केल्या. गॅबी लुईस २५ चेंडूत ३२ आणि कर्णधार एल डेलनी १७ चेंडूत २० धावांवर नाबाद राहिले. भारताकडून रेणुका सिंगने एक विकेट घेतली.

या गटातून इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. सध्या इंग्लंड ब गटातील गुणतालिकेत तीन सामन्यांत तीन विजय आणि सहा गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याला शेवटचा गट सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. अशा स्थितीत अव्वल स्थानावर असताना इंग्लंड उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चित आहे.

त्याचबरोबर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहून उपांत्य फेरी गाठेल. इंग्लंडचा निव्वळ रन रेट +१.७७६ आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतरही इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावर राहू शकतो. त्याच वेळी, भारताचा निव्वळ रन रेट +०.२९० आहे. ब गटातील वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि पाकिस्तानचे संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT