ICC Womens T20 World Cup 2023 : महिला टी-२० वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाची सर्वात अनुभवी फलंदाज स्मृति मंधाना ही पहिल्या सामन्यातून बाहेर झाली आहे. मंधानाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध अभ्यास सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यामुळे उद्या म्हणजेच रविवारी पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या टी-२० सामन्यात ती खेळू शकणार नाही. (Latest Marathi News)
स्मृति मंधाना दुखापतग्रस्त होऊन संघाबाहेर गेल्याने टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. मंधानाने ८ फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातही भाग घेतला नव्हता. दुसरीकडे भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जात आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात हरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत झाली होती, त्यानंतर ती अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकलेली नाही. दरम्यान विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला आपल्या मोहिमेची सुरुवात धमाकेदारपणे करायची आहे. अशा परिस्थितीत स्मृती मंधाना या सामन्यातून बाहेर राहिल्यास संघाच्या फलंदाजीवर मोठा दबाव निर्माण होऊ शकतो.
उद्या भारत-पाक रंगणार थरार
दक्षिण आफ्रिकेने आयोजित केलेल्या महिला टी-२० विश्वचषकात उद्या (रविवारी) टीम इंडियाचा सामना पाकिस्तान संघांशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचे दडपण दोन्ही संघाच्या खेळाडूंवर असेल. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मैदानावर महिला पंच आणि सामना अधिकाऱ्यांची जबाबदारी पार पाडणार आहेत. आताच झालेल्या अंडर १९ महिला वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यामध्ये बाजी मारली होती.
टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.