आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेचा थरार दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे. आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
गतविजेता भारतीय संघ या स्पर्धेत दमदार सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारतीय संघाने २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धेत विक्रमी पाचव्यांदा जेतेपदाचा मान पटकावला होता. बांगलादेशनंतर भारतीय संघाचे पुढील सामने आयर्लंड आणि अमेरिकेविरुद्ध होणार आहेत.
भारतीय संघ ५ वेळचा विजेता..
भारतीय संघाने २००२ मध्ये पहिल्यांदाच मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली अंडर १९ वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर २००८,२०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. यापूर्वी ही स्पर्धा श्रीलंकेत होणार होती मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केल्यामुळे स्पर्धेचं यजमानपद काढून घेण्यात आलं होतं. आता ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळली जात आहे. (Latest sports updates)
काही दिवसांपूर्वी अंडर १९ आशिया कप स्पर्धेचा थरार पार पडला होता. या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तिरंगी मालिकेत भारतीय संघाने एकही सामना न गमावता विजय मिळवला होता. ही तिरंगी मालिका भारत, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांमध्ये पार पडली.
आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :
उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव, इनेश महाजन (यष्टीरक्षक), धनुष गौडा, आराध्या शुक्ला, राज लिंबानी, नमन तिवारी, अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंग, रुद्र पटेल, सचिन धस, सौम्य पांडे, मुरुगन अभिषेक, प्रियांशू मोलिया, मुशीर खान
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.