Umpire Bismillah Jan Shinwari X
Sports

Umpire Death : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट अंपायरचे ४१ व्या वर्षी निधन, जय शाह यांनी वाहिली श्रद्धांजली

Umpire Bismillah Jan Shinwari : अफगाणिस्तानचे अंपायर बिस्मिला जान शिनवारी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Yash Shirke

Umpire Bismillah Jan Shinwari Demise : क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अंपायर बिस्मिल्ला जान शिनवारी यांचे निधन झाले आहे. ते ४१ वर्षांचे होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने यासंबंधित माहिती दिली आङे. शिनवारी यांच्या निधनाच्या बातमीने क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे.

बिस्मिल्ला जान शिनवारी हे आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय अंपायर पॅनेलचे सदस्य होते. २५ वनडे आणि २१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी अंपायरिंग केली होती. डिसेंबर २०१७ मध्ये शारजाह येथे अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड यांच्यात झालेल्या वनडे सामन्याद्वारे शिनवारी यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

१८ फेब्रुवारी रोजी ओमान विरुद्ध यूएसए हा वनडे फॉरमॅटमधला शिनवारी यांचा शेवटचा सामना होता. त्यानंतर १८ मार्च रोजी अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना अंपायर म्हणून त्यांनी काम केले होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने बिस्मिल्ला जान शिनवारी यांना श्रद्धांजली वाहत एक पोस्ट शेअर केली आहे. आजारपणामुळे शिववारी यांचे निधन झाले. ते अफगाण क्रिकेटचे खरे सेवक होते, असा उल्लेख क्रिकेट बोर्डाने केला आहे.

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनीही शिनवारी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केले. बिस्मिल्ला जान शिनवारी यांनी क्रिकेटसाठी खूप योगदान दिले आहे. त्यांंचे जाणे हे क्रिकेट जगतासाठी दु:खद आहे. त्यांच्या जाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शिनवारी यांचे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांप्रती मी शोक व्यक्त करतो, असे जय शाह यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT