कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा डाऊनफॉल सुरुच आहे. मायदेशात न्यूझीलंडकडून सुपडा साफ झाल्यानंतर, आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारताला १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.
या मालिकांचा परिणाम आता आयसीसी रँकिंगवर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कसोटी संघांच्या यादीत भारतीय संघाची मोठी घसरण झाली आहे. भारतीय संघ या यादीत कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.
भारतीय संघाने गेल्या १ दशकापासून आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये आपला दबदबा बनवून ठेवला होता. मात्र आता भारतीय संघाची मोठी घसरण झाली आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग २ मालिका गमावल्यानंतर भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघ आता १०९ रेटिंग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारताचा संघ दुसऱ्या स्थानी होता. मालिका संपल्यानंतरही दुसऱ्या स्थानी कायम होता. मात्र आता दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानताला पराभूत केल्यानंतर, समीकरण बदललं आहे.
दुसऱ्या स्थानी असलेला भारतीय संघ आता तिसऱ्या स्थानी सरकला आहे. पाकिस्तानला हरवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या रेटिंगमध्ये सुधारणा झाली. या रेटिंगच्या बळावर भारतीय संघाला मागे सोडत दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी पोहोचला. तर ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी कायम आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार पडलेली कसोटी मालिका ही भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची होती. मात्र या मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघाला ही मालिका ४-० किंवा ४-१ ने जिंकायची होती. मात्र मालिकेत उलटंच चित्र पाहायला मिळालं. भारताचा ३-१ ने पराभव झाला. या मालिका विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पराभव झाल्यानंतर भारतीय संघ बॅकफूटवर फेकला गेला.
भारतीय संघाकडे सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याची संधी होती. मात्र भारताने ही संधी गमावली आहे. स्पर्धेतील तिसऱ्या हंगामातील फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ खेळताना दिसून येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.