rohit sharma twitter
Sports

ICC Test Ranking: रोहित शर्माची टॉप 5 मध्ये एन्ट्री! जयस्वाल अन् विराटचीही मोठी झेप

ICC Rankings Updates: इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका झाल्यानंतर आयसीसीने टेस्ट रँकिंगची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

नुकताच इंग्लंड विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार पार पडला. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडला पराभूत केलं. मात्र इंग्लंडने मालिका आपल्या खिशात घातली.

या मालिकेनंतर आयसीसीने टेस्ट रँकिंगची घोषणा केली आहे. या यादीत टॉप १० मध्ये असलेल्या फलदाजांची चांजी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे.

रोहित शर्माची टॉप ५ मध्ये एन्ट्री

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुट अव्वल स्थानी कायम आहे. तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉप ५ मध्ये एन्ट्री केली आहे. भारतीय संघ ५ महिन्यांपूर्वी आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. मार्चनंतर भारतीय संघाने एकही कसोटी सामना खेळलेला नाही. तरीदेखील ७५१ रेटींग पॉईंट्ससह रोहित पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

तर यशस्वी जयस्वाल (७४० रेटींग पॉईंट्स) आणि विराट कोहली (७३७ रेटींग पॉईंट्स) यांनाही चांगलाच फायदा झाला आहे. यशस्वी जयस्वाल सहाव्या तर विराट कोहली सातव्या स्थानी पोहोचला आहे. यासह ७२८ रेटींग पॉईंट्ससह ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजा आठव्या स्थानी पोहोचला आहे.

कसोटी क्रिकेटमधील टॉप १० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये ३ भारतीय खेळाडूंनी प्रवेश केला आहे. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवान ७२० रेटींग पॉईंट्ससह नवव्या स्थानी, तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन ७२० रेटींग पॉईंट्ससह दहाव्या स्थानी आहे.

हे फलंदाज टॉप १० मधून बाहेर

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाद बाबर आझम या यादीत टॉप १० मध्ये होता, मात्र बांगलादेशविरुद्ध झालेल्या मालिकेतील फ्लॉप शो नंतर बाबर आझमची टॉप १० मधून सुट्टी झाली आहे. तो ७१२ रेटींग पॉईंट्ससह अकराव्या स्थानी जाऊन पोहोचला आहे. तर इंग्लंडचा आक्रमक फलंदाज हॅरा ब्रुक ७०९ रेटींग पॉईंट्ससह १२ व्या स्थानी सरकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

SCROLL FOR NEXT