icc t20 world cup 2024 schedule india vs pakistan latest Sports Updates  Saam TV
Sports

T20 World Cup Schedule: आयसीसीकडून टी 20 वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार?

T20 World Cup Schedule News: क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांना टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. मात्र, आज शुक्रवारी आयसीसीने टी-२० विश्वचषकाचं वेळपत्रक जाहीर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Vishal Gangurde

T20 World Cup 2024 Full Schedule in Marathi:

क्रिकेटप्रेमींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांना टी-२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. मात्र, आज शुक्रवारी आयसीसीने टी-२० विश्वचषकाचं वेळपत्रक जाहीर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. याच टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना ५ जूनला आर्यंलंडशी होणार आहे. (Latest Marathi News)

टी-२० विश्वचषकाची स्पर्धेत २० संघांनी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा १ जून २९ जून रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना एक जूनला कॅनडा विरुद्ध अमेरिकेदरम्यान होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना २९ जूनला बारबाडोसच्या मैदानावर होणार आहे.

भारताचा पहिला सामना कधी?

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना ५ जूनला होणार आहे. भारताचा ५ जूनला आर्यलंडशी सामना होणार आहे. तर भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना ९ जून रोजी होणार आहे. तर तिसरा सामना १३ जूनला अमेरिकेशी होणार आहे. चौथा सामना १५ जूनला कॅनडासोबत होणार आहे.

वेस्टइंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेत २० संघ सहभागी होणार आहे. सर्व २० संघाची ५-५ ने चार ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारताच्या ए- ग्रुपमध्ये पाकिस्तान, आयर्लंड, कॅनाडा आणि अमेरिकेचा सामावेश आहे.

कोणत्या ग्रुपमध्ये कोणते संघ?

ग्रुप ए : भारत , पाकिस्तान, आर्यलंड, कॅनडा, अमेरिका

ग्रुप बी : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामीबिया, स्कॉटलँड, ओमान

ग्रुप सी : न्यूझीलंड, वेस्टइंडीज, अफगाणिस्तान, युंगाडा, पापुआ न्यू गिनी

ग्रुप डी : दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

तीन टप्प्यात होणार स्पर्धा

पहिला टप्पा : पहिला टप्पा १ ते १८ जूनमध्ये होणार आहे. ग्रुपमधील प्रत्येक टीम एकमेकांविरोधात सामना खेळणार आहे.

सुपर 8 : १९-२४ जून दरम्यान सुपर ८ साठी सामने खेळण्यात येईल.

नॉकआऊट : सुपर- ८ मध्ये खेळाची चांगली कामगिरी करणारे उपांत्यफेरीत पोहोचतील. सेमीफायनलचा पहिला सामना २६ जून आणि २७ जूनला दुसरा सेमीफायनलचा सामना होईल. दोन्ही सेमीफायनमध्ये जिंकणाऱ्या दोन्ही संघाचा २९ जूनला अंतिम सामना होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tikona Fort History: महाराष्ट्राचा त्रिकोणी रत्न! तिकोना किल्ल्याचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि ट्रेकिंग अनुभव जाणून घ्या

Maharashtra Live News Update: विखे पाटलांचा आणि त्यांचा घराण्याचा आरक्षणाशी संबंध नाही लक्ष्मण हाकेंची जहरी टीका

Onion Ban: कांदा न खाण्याची अनोखी परंपरा! भारतातील 'या' ठिकाणी कांदा खात नाहीत

Bihar Election : बिहारमध्ये भाजप सत्तेत येणार, शरद पवारांच्या आमदाराने सांगितले गणित

महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भयंकर घडलं; माजी क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT