ind vs pak saam tv news
क्रीडा

T20 World Cup 2024 : भारत- पाकिस्तान टी-२० वर्ल्डकप सामन्याची तारीख ठरली! या दिवशी रंगणार महामुकाबला

India vs Pakistan Match Date: आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा येत्या सोमवारी केली जाऊ शकते. तर बहुप्रतिक्षीत भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख समोर आली आहे.

Ankush Dhavre

T20 World Cup 2024 Schedule :

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर सुरु आहे. ही मालिका सुरु असताना टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की, आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा येत्या सोमवारी केली जाऊ शकते. तर बहुप्रतिक्षीत भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख समोर आली आहे.

या दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान संघ...

या स्पर्धेत एकूण २० संघ खेळताना दिसून येणार आहेत. या सर्व संघांना ४ ग्रुपमध्ये विभागलं जाणार आहे. सर्व ४ ग्रुपमध्ये प्रत्येकी ५-५ संघ असतील. स्पर्धेचा रोमांच वाढवण्यासाठी आयोजकांनी भारत- पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही संघ ९ जून रोजी आमने सामने येऊ शकतात. तर भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड संघाविरुद्ध खेळला जाऊ शकतो. भारतीय संघाचे सर्व सामने यूएसएमध्ये होणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Latest sports updates)

असे असू शकतात भारतीय संघाचे सामने..

भारत विरुद्ध आयर्लंड- ५ जून

भारत विरुद्ध पाकिस्तान - ९ जून

भारत विरुद्ध यूएसए- १२ जून

भारत विरुद्ध कॅनडा- १५ जून

साखळी फेरीतील सामने झाल्यानंतर दोन्ही संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करतील. प्रत्येक गटातील २-२ संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करतील. या ग्रुपमधील टॉप २ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. दोन्ही संघांचा फॉर्म पाहता भारत आणि पाकिस्ताने हे दोन्ही संघ सुपर-८ मध्ये सहज प्रवेश करु शकतात. त्यानंतर हे दोन्ही संघ सेमीफायनल किंवा फायनलमध्ये पुन्हा एकदा आमने सामने येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT