T20 World Cup 2024 India Vs Pakistan Match Latest News:  Saamtv
Sports

India Vs Pakistan: महामुकाबल्यात टॉस ठरणार बॉस! भारत-पाकिस्तान सामन्याचा पहिल्या १० मिनिटातच निकाल? जाणून घ्या कारण...

T20 World Cup 2024 India Vs Pakistan Match Latest News: जगभरातील क्रिडा प्रेमींचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. विश्वचषकातील या अटीतटीच्या लढतीत नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरणार आहे.

Gangappa Pujari

टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आजचा दिवस सुपर संडे ठरणार आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानमध्ये आज लढत होईल. जगभरातील क्रिडा प्रेमींचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. विश्वचषकातील या अटीतटीच्या लढतीत नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरणार आहे. काय आहे नाणेफेक अन् खेळपट्टीचे समीकरण? जाणून घ्या सविस्तर.

नाणेफेकीचा कौल ठरणार महत्वाचा?

टी ट्वेंटी विश्वचषकातील सर्वात महत्वाची लढत म्हणजेच भारत- पाकिस्तान यांच्यामधील सामना आज होणार आहे. न्यूयॉर्कच्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर हा सामना खेळवला जाईल. न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या या स्पर्धेत आत्तापर्यंत आलेल्या अनुभवानुसार सामन्याचा नाणेफैकीचा कौल महत्वाचा ठरला आहे.

काय आहे खेळपट्टीचे समीकरण?

न्यू यॉर्कमध्ये नव्याने बांधलेल्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये ड्रॉप-इन खेळपट्टी वापरली जात आहे, जी ऑस्ट्रेलियातून आयात केली गेली आहे आणि जमिनीवर बसविली गेली आहे. अशा खेळपट्ट्या सेट होण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागतो, परंतु घाईघाईने तयार केलेल्या खेळपट्ट्यांवर जोरदार टीका होत आहे.

कारण भारत-आयर्लंड सामन्यात असमान उसळी, जास्त स्विंग आणि खराब आउटफिल्ड दिसले. सकाळपासून सुरू होणाऱ्या सामन्यात गोलंदाजांची मदत मिळत आहे, पण जसजसा दिवस सरत आहे, तसतशी सूर्यप्रकाशामुळे फलंदाजी करणे सोपे होत आहे, त्यामुळे येथेही नंतर फलंदाजी करणे फायदेशीर ठरेल.

फलंदाजांना फटका?

साधारणपणे, टी-२० फॉरमॅटमधील बहुतेक सामने रात्री सुरू होतात, जेथे दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाला दव असल्यामुळे फायदा होतो, कारण चेंडू ओला असल्यामुळे गोलंदाजाला चेंडू पकडता येत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. फलंदाज खराब चेंडूंवर खुले फटके खेळतात. मात्र न्यूयॉर्कमधील या खेळपट्टीवर चेंडू किती उसळी घेतोय याचा अंदाज घेणे आतापर्यंत शक्य झाले नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी टॉस जिंकणे फायदेशीर ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT