england and netherland cricket team twitter
Sports

T-20 World Cup 2024: इंग्लंडला मोठा धक्का! तर नेदरलँडची विजयी सलामी

England vs Scotland Highlights: आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील इंग्लंडला पहिल्याच सामन्यात मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत ४ जून रोजी २ सामने खेळले गेले आहेत. पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि स्कॉटलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. तर दुसरीकडे नेपाळविरुद्ध नेदरलँड यांच्यात झालेल्या सामन्यात नेदरलँडने एकतर्फी विजय मिळवला आहे.

इंग्लंडला मोठा धक्का

टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील एकूण एक सामना हा महत्वाचा असतो. मात्र इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केला. त्यामुळे हा सामना पाहिल्या डावातील १० षटक झाल्यानंतर पुढे गेलाच नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला गेला आहे. प्रत्येक संघाला आपल्या ग्रुपमधून टॉप २ मध्ये पोहचण्यासाठी १-१ गुण महत्वाचा आहे. त्यामुळे हा रद्द झालेला सामना गतविजेत्या इंग्लंडचं टेन्शन वाढवू शकतो.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर स्कॉटलंडने नाणेफेक जिंकता प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलंडकडून फलंदाजी करताना मायकल जोन्स आणि जॉर्ज मुंसीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. जोन्सने नाबाद ४५ तर मुंसीने नाबाद ४१ धावा करत संघाची धावसंख्या बिनबाद ९० धावांवर पोहचवली. मात्र त्यानंतर पाऊस आल्याने हा सामना रद्द करण्यात आला.

तसेच नेदरलँड आणि नेपाळ यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नेदरलँडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या नेपाळचा डाव १९.२ षटकात १०६ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने १८.४ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि शानदार विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अपहरण करून शेतात फरपटत नेलं, अत्याचारानंतर मुलीला तडफडवलं; ८ वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या

माझी बायको घर सोडून गेली, मी जिवंत राहणार नाही; पाण्याच्या टाकीवर चढून नवऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये 'तारक मेहता का उलटा चश्मा'मधील 'या' सदस्याची एन्ट्री, कोण आहे ती?

Gk : मोठ्या प्राण्यांचे तोंड लांब का असते? कारण वाचून तुम्ही ही पडाल विचारात

SCROLL FOR NEXT