Team India ICC t20 Ranking Update saam tv
Sports

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

sanju samson big jump in icc t20 rankings after world cup heroics : आयसीसीकडून टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर नव्याने टी २० रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. यात मोठा उलटफेर झाला आहे. वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघांच्या खेळाडूंचा दबदबा या रँकिंगमध्ये दिसून येत आहे.

Nandkumar Joshi

टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर आयसीसीनं टी २० रँकिंग जाहीर केली आहे. वर्ल्डकप स्पर्धेनंतर पहिल्यांदाज ही रँकिंग जाहीर झाली असून, यात भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा दिसून येत आहे. टी २० रँकिंगमध्ये धडाकेबाज फलंदाज इशान किशन यानं मोठी झेप घेतली आहे. तो दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर टी २० वर्ल्डकपमध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अपयशी ठरलेला अभिषेक शर्मा हा पहिल्या स्थानी कायम आहे. मात्र, इशान किशन आणि शर्मा यांच्यातील स्पर्धा तीव्र झाली आहे.

अंतिम लढतीत न्यूझीलंडला नमवून भारतानं टी २० वर्ल्डकपवर नाव कोरलं. सलग दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्डकप स्पर्धा जिंकून इतिहास घडवला आहे. या वर्ल्डकप स्पर्धेनंतर आयसीसीनं पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी २० रँकिंग जाहीर केली आहे. वर्ल्डकप स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्याचा फायदा इशान किशनला झाला आहे. त्यानं थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर सुरुवातीच्या सामन्यांत अपयशी ठरलेला अभिषेक शर्मा पहिल्या स्थानी आहे. महत्वाच्या तीन सामन्यांमध्ये तुफानी फटकेबाजी करून भारताला विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या संजू सॅमसननं तर मोठी झेप घेतली आहे. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचं मोठं नुकसान झालं आहे.

अभिषेक शर्मा पहिल्या स्थानी कायम

भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा अद्याप पहिल्या स्थानी आहे. पण त्याचं पहिलं स्थान किती वेळ टिकेल याची शाश्वती नाही. कारण दुसऱ्या स्थानी भारताचा स्टार फलंदाज इशान किशन आहे. या दोघांच्या रेटिंगमध्ये फारसं अंतर राहिलं नाही. शर्माची रेटिंग ८७५ आहे. तर इशान किशनची रेटिंग ८७१ आहे. शर्मा आणि किशन यांच्यात फक्त चार रेटिंग पॉइंट्सचं अंतर आहे.

पाकिस्तानचा साहिबजादाचं स्थान धोक्यात

पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याची रँकिंगमध्ये एका स्थानाची घसरण झाली आहे. तो तिसऱ्या स्थानी घसरला आहे. त्याचे रेटिंग पॉइंट्स ८४८ आहे. इंग्लंडच्या फिल साल्टचीही एका स्थानाची घसरण झाली आहे. ७९२ रेटिंगसह तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे. श्रीलंकेचा पथुम निसंका हा पाचव्या स्थानी आहे.

न्यूझीलंडचा टीम सिफर्ट यानं जबरदस्त झेप घेतली आहे. चार स्थानांनी झेपावत तो सहाव्या स्थानी पोहोचला आहे. भारताचा तिलक वर्मा याची एका स्थानानं घसरण झालीय. तो सातव्या स्थानी, तर दक्षिण आफ्रिकेचा ब्रेविस आठव्या स्थानी आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचे दोन स्थानांचे नुकसान झाले असून, तो नवव्या स्थानी घसरला आहे. तर इंग्लंडचा बटलर ७१६ रेटिंगसह दहाव्या स्थानी आहे.

संजू सॅमसनची १८ स्थानांची झेप

टी २० वर्ल्डकपमध्ये अखेरच्या तीन नॉक आउट सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या संजू सॅमसननं टी २० रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. रँकिंगमध्ये १८ स्थानांची झेप घेत तो २२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. टी २० वर्ल्डकपच्या अखेरच्या तीन सामन्यांमध्ये संजू सॅमसनने ८० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्याचा फायदा त्याला ताज्या क्रमवारीत झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

Maharashtra Live News Update: चाकण औद्योगिक क्षेत्रात फटका; 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

SCROLL FOR NEXT