आयसीसीने जाहीर केलेल्या टी २० रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा दिसून आलाय. saam tv
Sports

ICC Ranking : टी २० मध्ये टीम इंडियाचा धमाका; कर्णधार टॉप ५ मध्ये, दोघांमध्ये पहिल्या क्रमांकासाठी चढाओढ

ICC T20 batting rankings latest update : आयसीसीनं टी २० रँकिंग जाहीर केलीय. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर यानं मोठी झेप घेतली आहे. टॉप ५ मध्ये त्यानं एन्ट्री केली असून, पहिल्या स्थानासाठी दोन भारतीय फलंदाजांमध्ये जबरदस्त चुरस आहे.

Nandkumar Joshi

भारतीय संघाचा 'सरपंच' अर्थात कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या टी २० रँकिंगमध्ये त्यानं मोठी झेप घेतली आहे. पहिल्या पाचमध्ये त्याची एन्ट्री झाली असून, सध्या तो चौथ्या स्थानी आहे. तर भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून युवा फलंदाज इशान किशन हा पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. आता अभिषेक आणि इशान या दोघांमध्ये पहिल्या क्रमांकासाठी शर्यत लागली आहे.

युवा फलंदाज पहिल्या स्थानी

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात ५ सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. आतापर्यंत ३ सामने झाले आहेत. भारतानं यात २-१ अशी आघाडी घेतलीय. ही मालिका सुरू असतानाच, आयसीसीनं नवी रँकिंग जाहीर केलीय. टी २० रँकिंगमध्ये युवा फलंदाज इशान किशन पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याची रेटिंग ९०४ आहे. दुसऱ्या स्थानी अभिषेक शर्मा आहे. त्यांची रेटिंग ८९१ आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकातील रेटिंगमधील अंतर अत्यंत कमी आहे. आगामी काळात ही स्पर्धा आणखी अटातटीची होऊ शकते.

श्रेयस अय्यर थेट चौथ्या स्थानी

टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर यानं मोठी झेप घेतलीय. तीन स्थानांनी झेप घेत तो थेट चौथ्या स्थानी पोहोचला आहे. त्याच्या रेटिंगमध्ये वाढ झाली असून, ती ७९८ झाली आहे. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान ८८३ च्या रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी २० मालिकेच्या पहिल्या सामन्यात श्रेयसनं नाबाद १०२ धावांची तुफानी खेळी केली होती. तर दुसऱ्या सामन्यात त्यानं ४० धावा कुटल्या होत्या. पण तिसऱ्या सामन्यात फक्त एक धाव करता आली. मालिकेतील दोन सामने खेळायचे आहेत. श्रेयसनं या दोन्ही सामन्यांत मोठी खेळी केली तर, तो तिसऱ्या स्थानी जाऊ शकतो.

तिलक वर्माला जबरदस्त फायदा

श्रेयस अय्यरनं झेप घेतल्यानं इंग्लंडच्या हॅरी ब्रुक आणि जोस बटलर यांना जोरदार झटका बसला आहे. हे दोघेही अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. तिलक वर्माला एका स्थानाचा फायदा झालाय. तो ७३१ रेटिंगसह नवव्या स्थानी पोहोचलाय. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपला दोन स्थानांचा फायदा झालाय. सध्या तो ११ व्या स्थानी असून, त्याची रेटिंग सध्या ७१८ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन

CJP Protest: आशुतोष रांका, सौरव दास यांच्या अडचणी वाढणार? ५ दिवस नाही तर २ ते ५ वर्षे होऊ शकतो तुरुंगवास, कायदेतज्ज्ञांनी काय सांगितलं?

Car tyre pressure: कारच्या टायरमध्ये किती PSI हवा असावी?

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना राज्य सरकारनं दिलं दिवाळीचं गिफ्ट; महायुती सरकारनं घेतला मोठा निर्णय

Healthy Evening Snacks: संध्याकाळच्या हलक्या भुकेवर भारी उपाय, खा काहीतरी टेस्टी आणि हेल्दी

SCROLL FOR NEXT