Shubman Gill-Mohammed Siraj Saam Tv
Sports

ICC Ranking : शुभमन गिल, मोहम्मद सिराजची मोठी झेप; पाकिस्तानी खेळाडूंना दणका देत ICC क्रमवारीत अव्वल स्थानी

ICC Ranking Update : शुभमन गिलने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे सोडत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

प्रविण वाकचौरे

Shubman Gill-Mohammed Siraj News :

टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन शुभमन गिल जगातील सर्वोत्तम वनडे फलंदाज ठरला आहे.आयसीसीने जारी केलेल्या नव्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, शुभमन गिल आता वनडे फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर-1 फलंदाज आहे. शुभमन गिलने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे सोडत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

त्याचबरोबर भारताच्या मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा वनडे गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीला मागे टाकत त्याने पहिले स्थान मिळवले.

शुभमन गिलसाठी यंदाचं २०२३ वर्ष खास राहिलं आहे. यावर्षी त्याची बॅट सर्व तिन्ही फॉरमॅटमध्ये तळपली आहे. एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे.

विश्वचषकात सुरुवातीचे काही सामन्यात तो खेळू शकला नाहीत. मात्र त्यानंतर इतर सामन्यात त्याने उत्तम कामगिरी केली. तर दुसरीकडे बाबर आझमची बॅड विश्वचषकात थंड राहिली. ज्याचा परिणाम आयसीसी वनडे क्रमवारीत दिसून आला.

टॉप १०मध्ये भारताचे ३ फलंदाज

आता एकदिवसीय क्रमवारीत शुभमल गिलचे ८३० गुण झाले आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या बाबर आझमचे ८२४ गुण आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आहे, ज्याचे ७७१ गुण आहेत. या तिघांशिवाय विराट कोहलीनेही या विश्वचषकात ५०० हून अधिक धावा करून ICC एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत विराट कोहली आता चौथ्या स्थानावर आला आहे.

आयसीसी वनडे क्रमवारीत विराटचे ७७० गुण आहेत. पुढील काही सामन्यात चांगल्या खेळीनंतर विराट आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत ३ नंबरवरही येऊ शकतो. विराटनंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याचे ७४३ गुण आहेत. त्याचबरोबर वॉर्नरनंतर सहाव्या क्रमांकावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आहे, ज्याचे ७३९ गुण आहेत.

टॉप १० मध्ये भारताचे ४ गोलंदाज

भारताच्या चार गोलंदाजांनी अव्वल १० वनडे गोलंदाजांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. विश्वचषकातील भारतीय गोलंदाजी आतापर्यंत सर्वोत्कृष्ट दिसली आणि त्याचा फायदा त्यांना झाला. सिराजने पुन्हा एकदा वनडेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीला मागे टाकले. याचबरोबर कुलदीप यादव तीन स्थानांची झेप घेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जसप्रीत बुमराह तीन स्थानांनी सुधारून आठव्या स्थानावर पोहोचला आहे. तर मोहम्मद शमीने सात स्थानांची झेप घेत दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. हे चौघेही वनडे गोलंदाजांच्या टॉप १० यादीत पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT