आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने संघ आणि फलंदाजांच्या क्रमवारी जाहीर केलीय. टी२० विश्वचषकाच्या सुरुवातीस क्रमवारी जाहीर झाल्याने या स्पर्धेची रंगत अजून वाढणार आहे. दरम्यान या क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाने पहिलं स्थान कामय ठेवलं आहे. आगामी वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्सच्या दौऱ्यापूर्वी पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारी जाहीर केल्याने इतर संघावर भारतीय संघाचा दबाव जाणवेल.
दरम्यान या क्रमवारीत भारताचे 264 रेटिंग गुण आहेत. दोन वेळा चॅम्पियन राहिलेल्या वेस्ट इंडिजने टी- 20 विश्वचषकापूर्वी त्यांचे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आल्याने ते चौथ्या स्थानावर पोहोचले. 2012 आणि 2016 चे विजेता दक्षिण आफ्रिकेवर 3-0 ने विजय मिळवून न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या पुढे आहे.
तर दक्षिण आफ्रिकेची सातव्या स्थानावर घसरण झालीय. 2021 चा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया 257 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गतविजेता इंग्लंड 254 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि वेस्ट इंडिज 252 गुणांसह दोन गुणांनी मागे आहे. न्यूझीलंडचे 250 गुण आहेत तर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे 244 गुण आहेत. दशांश गणनेत पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेपेक्षा पुढे आहे.
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी 2 जून रोजी पापुआ न्यू गिनीविरुद्ध स्पर्धा सुरू करण्यापूर्वी घरच्या मालिकेत चमकदार कामगिरी केलीय. याचा फायदा त्यांना क्रमवारीत झाला. ताज्या अपडेटमध्ये बांगलादेश आणि अमेरिका यांच्यातील मालिकेचे निकाल आणि इंग्लंड आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या मालिकेचाही समावेश केला जाणार आहे. भारताचा सूर्यकुमार यादवचा फलंदाजांच्या क्रमवारीत जलवा कायम आहे. सूर्यकुमार पहिल्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट दुसऱ्या तर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान तिसऱ्या स्थानावर आहे. बाबर आझम चौथ्या आणि एडन मार्कराम पाचव्या स्थानावर आहे.
दरम्यान भारताच्या T20 विश्वचषकाची मोहीम 5 जूनपासून आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापासून होणार आहे. हा सामना न्यू यॉर्कमधील नव्याने बांधलेल्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना ९ जून रोजी होणार आहे. त्यानंतर संघ 12 जून रोजी स्पर्धेतील सह-यजमान युनायटेड स्टेट्स आणि 15 जून रोजी कॅनडाशी भारताचा सामना होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.