Team India Virat Kohli ton against South Africa saam tv
Sports

टीम इंडियानं वनडे मालिका खिशात घातली; आयसीसीनं अख्ख्या भारतीय संघाच्या खिशात हात घातला

Team India Penalised By ICC : दक्षिण आफ्रिकाविरुद्धची वनडे मालिका जिंकूनही आयसीसीनं भारतीय संघावर मोठी कारवाई केली आहे. भारतानं तिसरा वनडे सामना जिंकून मालिका खिशात घातली होती.

Nandkumar Joshi

Ind vs SA ODI Series : हंगामी कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घातली. कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडे मालिकेत भारताचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं कमबॅक झालं. दोघांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाला वनडे मालिकेत धूळ चारण्यात यश आलं. याच भारतीय संघावर आयसीसीनं मोठी कारवाई केली.

भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकाविरुद्धची वनडे मालिका २-१ ने जिंकली. भारतानं पहिला सामना १७ धावांनी जिंकला होता. पण दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं जोरदार कमबॅक केलं. धावांचा डोंगर उभारूनही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ते आव्हान लिलया पार केलं. चार विकेट राखून विजय मिळवला होता. त्यानंतरच्या अखेरच्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात भारतानं पुन्हा दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल यांनी पाया रचल्यानंतर विराटनं विजयी कळस रचला. त्या जोरावर भारतानं ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिकाही जिंकली. पण आयसीसीनं विजेत्या भारतीय संघावर दंडात्मक कारवाई केली आहे. रायपूरच्या दुसऱ्या वनडे सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळं भारतीय संघाला १० टक्के दंड आकारला आहे.

दोन ओव्हर कमी फेकल्या

भारतीय गोलंदाजांनी निर्धारित वेळेत दोन षटकं कमी फेकली होती. आयसीसीच्या एलीट पॅनलच्या मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी केएल राहुल याच्या नेतृत्वातील भारतीय संघावर दंडात्मक कारवाई केली. दुसऱ्या वनडे सामन्यात संघाने निर्धारित वेळेत दोन षटके कमी फेकली होती. आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद २.२२ नुसार हा दंड आकारण्यात आला आहे.

केएल राहुलने चूक स्वीकारली

कर्णधार केएल राहुल यानं आरोप आणि दंडात्मक कारवाई मान्य केली आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची काही गरज भासली नाही. जर एखाद्या संघाने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकलं असेल तर त्यांच्या सामन्याच्या मानधनापैकी पाच टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाते. भारतीय संघाने दोन षटके कमी फेकली होती. त्यामुळे त्यांच्यावर सामन्याच्या मानधनापैकी १० टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली.

कोहली आणि गायकवाडनं ठोकली होती शतके

दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना ३५८ धावांचा डोंगर उभा केला होता. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी शतके ठोकली होती. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर संघानं साडेतीनशेहून अधिक धावा केल्या. कोहलीने १०२ धावा केल्या. गायकवाडने १०५ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं हे आव्हान सहज पार केले. एडन मार्क्रम हा हिरो ठरला. त्यानं ११० धावांची तुफानी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. मार्क्रमला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? शिंदेंसेनेचे 22 आमदार फुटणार?

Winter Hair Care Tips: रात्री झोपण्यापूर्वी केस विंचरल्याने काय फायदा होतो? वाचा

बिबट्यामुळे बळी, मिळणार सरकारी नोकरी?हल्ल्यात बळी पडलेल्यांना सरकारचा दिलासा?

Dried Dates Benefits: हिवाळ्यात खारीक खाण्याने होतील 'हे' हेल्दी फायदे

Winter Almond Milk Benefits: थंडीत बदाम दूध पिण्याचे चमत्कारिक फायदे

SCROLL FOR NEXT