ICC ODI Team Of the year saam tv news
Sports

ICC Men's ODI Team of the Year: आयसीसीच्या सर्वोत्तम वनडे संघात टीम इंडियाचा बोलबाला! ११ पैकी ६ खेळाडू भारतीय

ICC Men's ODI Team of the Year in 2023: नुकताच आयसीसीने २०२३ वर्षातील सर्वोत्तम वनडे संघाची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

ICC Men's ODI Team of the Year in 2023:

आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसीने) मंगळवारी (२३ जानेवारी) ICC ODI Team Of The Year 2023 ची घोषणा केली आहे. या संघात भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. मुख्य बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या पॅट कमिन्सला या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. तर भारतीय कर्णधार रोहित शर्माकडे या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

रोहित शर्मासह ६ भारतीय खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आलं आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघातील प्रत्येकी २-२ खेळाडूंना या संघात स्थान दिलं गेलं आहे. तर न्यूझीलंडच्या एकमेव खेळाडूला या संघात स्थान दिलं गेलं आहे.

भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मासह सलामीवीर फलंदाज शुभमन गिल,अनुभवी फलंदाज विराट कोहली, संघातील प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संघात स्थान दिलं गेलं आहे. (Latest sports updates)

रोहित शर्मा आणि युवा फलंदाज शुभमन गिलची सलामीवीर फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. तर विराट कोहलीची चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ट्रेविस हेड आणि अॅडम झाम्पाला देखील या संघात स्थान देण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिका संघातील मार्को यान्सेन आणि हेनरिक क्लासेन यांना या संघात स्थान देण्यात आलं आहे.

तर न्यूझीलंड संघातील एकमेव खेळाडू डॅरिल मिशेलचा या संघात समावेश करण्यात आला आहे. वनडे संघासह टी-२० संघातही भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. वनडे संघाचं कर्णधारपद रोहितकडे तर टी-२० संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलं आहे.

आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर २०२३ –

रोहित शर्मा, शुबमन गिल, ट्रेविस हेड, विराट कोहली, डॅरिल मिशेल, हेनरिक क्लासेन, मार्को जेन्सन, ऍडम झॅम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

SCROLL FOR NEXT