babar azam with rohit sharma twitter
Sports

ICC ODI World Cup 2023: वर्ल्डकप 2023 स्पर्धेबाबत मोठी अपडेट!भारत - पाकिस्तान सामन्यासह 'या' 6 सामन्यांच्या तारखा बदलणार?

ICC ODI World Cup 2023 Timetable: वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील आणखी ६ सामन्यांच्या वेळापत्रकात देखील बदल केला जाणार आहे.

Ankush Dhavre

India Vs Pakisatn Match Date Change:

भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. काही दिवसांपू्र्वी या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता या स्पर्धेच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.

भारत-पाकिस्तान सामना येत्या १५ ऑक्टोबर रोजी रंगणार होता. मात्र आता या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे. हा सामना १४ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. या सामन्यासह आणखी ६ सामन्यांच्या वेळापत्रकात देखील बदल केला जाणार आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील या ६ सामन्यांची तारीख बदलणार..

भारत- पाकिस्तान सामन्यांच्या तारखेत बदल होताच आणखी ६ सामन्यांची तारीख बदलणार आहे. RevSportz च्या वृत्तानुसार पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यादरम्यान होणारा सामना १२ ऑक्टोबर ऐवजी १०

ऑक्टेबर रोजी खेळवला जाऊ शकतो. तर न्यूझीलंड विरूद्ध नेदरलँड यांच्यात होणारा सामना ९ ऑक्टोबर ऐवजी १२ ऑक्टोबर रोजी खेळवला जाऊ शकतो. तसेच न्यूझीलंड विरूद्ध बांगलादेश यांच्यात १४ ऑक्टोबर रोजी होणारा सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाऊ शकतो.

अपडेटेड वेळापत्रकाची लवकरच होऊ शकते घोषणा..

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अपडेटेड वेळापत्रकाची घोषणा २ किंवा ३ ऑगस्ट रोजी केली जाऊ शकते. या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. या सामन्याचे आयोजन देखील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. (Latest sports updates)

आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी असे आहे भारतीय संघाचे वेळापत्रक..

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई

  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर, दिल्ली

  • भारत विरुद्ध पाकिस्तान, १४ ऑक्टोबर, अहमदाबाद

  • भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड २२ ऑक्टोबर धर्मशाळा

  • भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ

  • भारत विरुद्ध नेदरलँड्स, २ नोव्हेंबर, मुंबई

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता

  • भारत विरुद्ध श्रीलंका, ११ नोव्हेंबर, बेंगळुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT