icc rankings team india x
Sports

ICC Rankings मध्ये टीम इंडिया वनडे, टी-20 मध्ये अव्वल; पण कसोटीत घसरण...

ICC Rankings News : आयसीसीद्वारे वार्षिक संघ क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडिया, तर कसोटी फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलिया प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने वार्षिक संघ क्रमवारी जाहीर केली आहे. कसोटी फॉरमॅटवर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानी आहे. तर टीम इंडिया एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्ये टेबल टॉपर्स आहेत. सलग दोन कसोटी मालिका गमावल्याने भारताची रँकिंग घसरली आहे. कसोटी क्रमवारीच्या टॉप ३ मधून भारतील संघ बाहेर पडला आहे. उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप ३ मध्ये असल्याचे पाहायला मिळते.

ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ३-१ ने भारताचा पराभव केला. याशिवाय ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेला २-० ने हरवले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा संघ सलग दुसऱ्यांदा पोहोचला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रमवारीत मागे पडला आहे. वनडे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत टॉपला आहे.

ICC Test Rankings मध्ये सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ १२६ गुणांनी प्रथम स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडकडे ११३ गुण आहेत, तर तिसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे १११ गुण आहे. कसोटी क्रमवारीच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताकडे १०५ गुण आहेत. न्यूझीलंड पाचव्या, श्रीलंका सहाव्या तर पाकिस्तान सातव्या स्थानी आहे.

ICC ODI Rankings मध्ये १२४ गुणांसह टीम इंडिया अव्वलस्थानी आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांकडे १०९ गुण असूनही न्यूझीलंड दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेच्या संघाकडे १०४ गुण आहेत. तर पाकिस्तान या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहे.

ICC T20 Rankings मध्येही भारत टेबल टॉपर्स आहेत. २७१ गुण मिळवत भारताच्या संघाने प्रथम स्थान पटकावले आहे. २६२ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी विराजमान आहे, तिसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंडच्या खात्यात २५३ गुण आहेत. टी-२० क्रमवारीमध्ये न्यूझीलंड चौथ्या आणि वेस्ट इंडिज पाचव्या नंबरवर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT