भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा खिताब जिंकला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर ४ गडी राखून मात केली. रोहितच्या नेतृत्वात ९ महिन्याच्या आत भारताने एक वर्ल्डकप आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी अशा दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या. याच दरम्यान आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सर्वश्रेष्ठ संघाची घोषणा केली.
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या बेस्ट प्लेईंग ११ ची घोषणा केली. त्यात १२ वा खेळाडूही टॉप क्लास आहे. यजमान पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचा यात समावेश नाही. सोबतच बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमधील खेळाडूंची देखील टीममधून वगळण्यात आले आहे. आनंदाची बाब म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या बेस्ट प्लेईंग ११ मध्ये पाच भारतीय खेळाडू आहेत.
विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती यांचा प्लेईंग ११ मध्ये समावेश आहे. या स्पर्धेत विराटने २१८ धावा केल्या. २४३ धावा करत श्रेयस अय्यर सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला. मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी ९-९ विकेट्स घेतल्या. या प्लेईंग ११ मध्ये रोहित शर्माचे नाव वगळल्याने चाहते नाराज झाले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट आणि गोल्डन बॅट मिळवणाऱ्या रचिन रविंद्रचा टीममध्ये समावेश आहे. १० विकेट घेत गोल्डन बॉल जिंकणाऱ्या मॅट हेनरीच्या नावाची नोंद प्लेईंग ११ मध्ये आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरकडे या संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची बेस्ट प्लेईंग ११ -
रचिन रविंद्र, इब्राहिम जारदान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, अजमतुल्लाह उमरजई, मिचेल सँटनर (कर्णधार), मोहम्मद शमी, मॅट हेनरी, वरुण चक्रवर्ती (अक्षर पटेल - १२ वा खेळाडू)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.