joe root twitter
Sports

Test Cricketer Of The Year पुरस्कारासाठी ४ नामांकनं जाहीर! या भारतीय खेळाडूचाही समावेश

ICC Test Cricketer Of Thea Year Award: आयसीसी मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कारासाठी ४ खेळाडूंना नामांकनं मिळालं आहे. दरम्यान कोणाला मिळणार पुरस्कार ?

Ankush Dhavre

वर्ष २०२४ संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसीकडून आयसीसी मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कार देण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी आयसीसीकडून ४ नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. ज्यात भारताच्या १,इंग्लंडच्या २ आणि श्रीलंकेच्या १ खेळाडूचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी रोहित शर्मा किंवा रोहित शर्मा नव्हे, तर जसप्रीत बुमराहच्या नावाचा समावेश आहे. तर इंग्लंडच्या जो रुट, हॅरी ब्रुक आणि श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसच्या नावाचा समावेश आहे.

कसोटीत बुमराहची धमाल कामगिरी

जसप्रीत बुमराह भारतीय संघातील सर्वात मोठा मॅचविनर आहे. जेव्हा जेव्हा संघाला त्याची गरज असते, तेव्हा तेव्हा तो संघाला विकेट काढून देत असतो. यावर्षीही त्याने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.

आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्याच्या या वर्षातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १३ कसोटी सामन्यांमध्ये ७१ गडी बाद केले आहेत.

जो रुट

इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटची बॅट देखील यावर्षी चांगलीच तळपली. यावर्षी फलंदाजी करताना त्याने १७ सामन्यांमध्ये १५५६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ शतक आणि ५ अर्धशतक झळकावली. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात केलेली २६२ धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. या दमदार कामगिरीसाठी त्याला नामांकन मिळालं आहे.

कामिंदू मेंडिस

श्रीलंकेचा स्टार फलंदाज कामिंदू मेंडिसने यावर्षी फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला. त्याने यावर्षी फलंदाजी करताना ९ सामन्यांमध्ये १०४९ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७४.९२ च्या सरासरीने धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने सलग २ दुहेरी शतकं झळकावली.

हॅरी ब्रुक

इंग्लंडचा आक्रमक फलंदाज हॅरी ब्रुकने यावर्षी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने यावर्षी फलंदाजी करताना १२ सामने खेळले. यादरम्यान त्याने ११०० धावा केल्या. त्याने ५५ च्या सरासरीने धावा करत १ त्रिशतक आणि ३ अर्धशतकं झळकावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT