ICC announced latest icc test ranking r ashwin becomes number 1 bowler in test cricket by surpassing josh hazlewood  twitter
क्रीडा

ICC Test Bowling Ranking: आर अश्विन कसोटीला खरा उतरला! बनला जगातील नंबर १ गोलंदाज

R Ashwin Test Ranking News: नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने ४-१ ने मालिका जिंकली.

Ankush Dhavre

ICC Test Ranking, R Ashwin:

नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने ४-१ ने मालिका जिंकली. दरम्यान या सामन्यात शानदार गोलंदाजी करणाऱ्या आर अश्विनला आयसीसीने मोठं गिफ्ट दिलं आहे. आर अश्विन आयसीसी कसोटी गोलंदाजीच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. (R Ashwin News In Marathi)

आर अश्विन नंबर १ बनण्यापूर्वी जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी होता. आता जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानी सरकला आहे. तर जोश हेजलवूड दुसऱ्या स्थानी सरकला आहे. आर अश्विनने ८७० रेटिंग पॉईंट्ससह अव्वल स्थान गाठलं आहे. तर ८४७ रेटिंग पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. तर जसप्रीत बुमराह ८४७ रेटिंग पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानी आहे.

आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या यादीतील टॉप १० गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर टॉप १० मध्ये ३ भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे. आर अश्विन अव्वल स्थानी आहे. तर जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानी आहे. यासह ७८८ रेटिंग पॉईंट्स असलेला रविंद्र जडेजा या यादीत सातव्या स्थानी आहे. तर कगिसो रबाडा चौथ्या स्थानी, पॅट कमिन्स पाचव्या स्थानी, नॅथन लायन सहाव्या स्थानी, प्रभात जयसूर्या आठव्या स्थानी, जेम्स अँडरसन नवव्या स्थानी आणि शाहीन आफ्रिदी दहाव्या स्थानी आहे. (Cricket news in marathi)

भारत- इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचवा कसोटी सामना हा आर अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना होता. या सामन्यातही दमदार कामगिरी करत त्याने ९ गडी बाद केले. संपूर्ण मालिकेत आर अश्विन हा इंग्लंडच्या फलंदाजांना नडला. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ४ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात त्याने ५ गडी बाद केले. दरम्यान या संपूर्ण मालिकेतील ५ सामन्यांमध्ये त्याने २६ गडी बाद केले. तो या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT