ICC Player Of The Month Award: यशस्वी जयस्वालला ICC कडून मोठं गिफ्ट! या बाबतीत केन विलियम्सनला सोडलं मागे

Yashasvi Jaiswal News in Marathi: भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली.
Yashasvi Jaiswal Won the Player of the Month Award for February Month
Yashasvi Jaiswal Won the Player of the Month Award for February Monthtwitter
Published On

Yashasvi Jaiswal Won ICC Player Of The Month Award:

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत यशस्वी जयस्वाल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. या कामगिरीच्या बळावर यशस्वी जयस्वालला आयसीसीकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. (Yashasvi Jaiswal)

यशस्वी जयस्वालची आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे. आय़सीसीने फेब्रुवारी महिन्यासाठी नामांकनं जाहीर केली होती. ज्यात यशस्वी जयस्वालसह पथुम निसंका, केन विलियम्सन यांचा समावेश होता. या दोन्ही खेळाडूंना मागे सोडत यशस्वी जयस्वालने या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. (Cricket News in Marathi)

Yashasvi Jaiswal Won the Player of the Month Award for February Month
WPL 2024, Playoffs Scenario: गुजरातच्या विजयानं RCB चा मोठा फायदा! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी करावं लागेल हे काम

यशस्वी जयस्वालला पहिल्यांदाच या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. पहिल्याच प्रयत्नात त्याला पुरस्कार मिळाला आहे. जयस्वालच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने या मालिकेत बॅक टू बॅक शतकं झळकावली होती. या मालिकेतील ९ डावात ८९.०० च्या सरासरीने ७१२ धावा चोपल्या. (Cricket news in martathi)

Yashasvi Jaiswal Won the Player of the Month Award for February Month
IPL 2024 New: मोठी बातमी! IPL खेळण्यासाठी Rishabh Pant ला BCCI कडून ग्रीन सिग्नल; हे २ प्रमुख गोलंदाज स्पर्धेतून बाहेर

हे आहेत आयसीसी क्रिकेटर ऑफ द मंथ पुरस्कार पटकावणारे भारतीय खेळाडू..

१) रिषभ पंत

२) रविचंद्रन अश्विन

३) भुवनेश्वर कुमार

४) श्रेयस अय्यर

५) विराट कोहली

६) शुभमन गिल (दोन वेळा)

७) यशस्वी जायस्वाल

भारतीय संघाचा शानदार विजय..

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यासह इंग्लंडने १-० ची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारतीय संघाने पुढील चारही सामने जिंकले आणि मालिकेवर ४-१ ने कब्जा केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com