Sidra Amin Pakistan  x
Sports

ICC चा पाकिस्तानी खेळाडूला मोठा दणका, IND Vs PAK सामन्यात रागात बॅट आपटणं महागात पडलं

Sidra Amin : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानची फलंदाज सिद्रा अमीनला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Yash Shirke

  • महिला पाकिस्तानी क्रिकेटपटूवर कारवाई

  • वर्ल्डकप सामन्यादरम्यान बॅट आपटल्याने शिक्षा

  • वर्तवणूकीमुळे आयसीसीने दिला दणका

Sidra Amin Pakistan : श्रीलंकेमध्ये महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धा सुरु आहे. काल (५ ऑक्टोबर) स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबोमध्ये खेळला गेला. या महामुकाबल्यामध्ये भारताने पाकिस्तानवर ८८ धावांनी विजय मिळवला. सामन्यात पाकिस्तानच्या सिद्रा अमीनने सर्वाधिक अशा ८१ धावा केल्या. पण एका कृत्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने पाकिस्तानी क्रिकेटपटू सिद्रा अमीनला शिक्षा सुनावली आहे. सामन्यामध्ये तिने ८१ धावांची झुंझार खेळी केली. स्नेह राणाच्या गोलंदाजीवर ती बाद झाली. बाद झाल्यानंतर अमीनने रागाच्या भरात तिची बॅट जमिनीवर जोरात आदळली. या वर्तनामुळे आयसीसीने तिला शिक्षा सुनावली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडू क्रिकेट उपकरणे किंवा कपडे किंवा मैदानावरील कोणत्याही मालमत्तेचे नुकसान करु शकत नाही असे म्हणत आयसीसीने आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत सिद्रा अमीनला दोषी ठरवले आहे. तिला एक डिमेरिट पॉइंट देखील देण्यात आला आहे. वर्षभरातला हा तिचा पहिलाच गुन्हा आहे.

मैदानावरील दोन्ही पंचांसह तिसऱ्या आणि चौथ्या पंचांनीही सिद्रा अमीनला दोषी ठरवले. तिने आपली चूक मान्य केली. त्यामुळे आयसीसीच्या सुनावणीची गरज उरली नाही. महिला विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये सिद्रा अमीनने सर्वात चांगली कामगिरी केली. तिच्या व्यतिरिक्त नतालिया परवेजने ३३ धावांचे योगदान दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील डॉक्टर निर्भया यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल.

Kartik Aaryan : इच्छाधारी नागाच्या रुपात कार्तिक आर्यन; नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू, रिलीज डेट काय?

BJP Silent March: विरोधकांचा कट हाणून पाडा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विरोधकांच्या मोर्चावर कडाडले, नेमकं काय म्हणाले?

Khakhra Chaat Recipe: कमी तेलात संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा झटपट कुरकुरीत खाकरा चाट

Satyacha Morcha : आजचा मोर्चा रिकामटेकड्या कार्यकर्त्यांची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'; अजित पवार गटाच्या आमदाराची टीका

SCROLL FOR NEXT