YOGRAJ SINGH MS DHONI SAAM TV
Sports

Yograj Singh: मी MS Dhoni ला कधीच माफ करणार नाही, त्यानं आरशात तोंड पाहावं! युवराज सिंगच्या वडिलांची जहरी टीका

Yograj Singh On MS Dhoni: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या वडिलांनी एमएस धोनीवर जहरी टीका केली आहे.

Ankush Dhavre

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी एमएस धोनीवर टीका करणं काही नवीन नाही. योगराज सिंग यांनी अनेकदा एमएस धोनीवर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी त्यांनी धोनीवर पुन्हा एकदा जोरदार टीका करत, युवराज सिंगची कारकिर्द उद्ध्वस्त करण्याचा आरोप केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

योगराज सिंग यांनी एका मुलाखतीत सहभाग घेतला होता. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, 'मी एमएस धोनीला कधीच माफ करणार नाही. त्याने आरशात आपलं तोंड पाहावं. तो खूप मोठा क्रिकेटपटू आहे, मात्र त्याने माझ्या मुलासोबत जे केलं आहे ते हळू हळू सर्वांसमोर येत आहे. त्यासाठी त्याला कधीच माफ करता येणार नाही. मी माझ्या आयुष्यात २ गोष्टी कधीच केलेल्या नाहीत. पहिलं म्हणजे, ज्याने माझ्यासोबत चुकीचं केलंय, त्याला मी कधीच माफ केलेलं नाही. दुसरं म्हणजे, या लोकांची मी कधीच गळाभेट घेतलेली नाही. ते माझ्या कुटुंबाचे सदस्य असो किंवा माझी मुलं.'

योगराज सिंग यांनी आयपीएल २०२४ स्पर्धेच्या फायनलनंतरही एमएस धोनीवर टीका केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, 'सीएसकेने आयपीएल २०२४ स्पर्धेची फायनल गमावली, त्यांनी हा सामना का गमावला? युवराज सिंग आयसीसीचा अॅम्बेसेडर आहे. धोनीने युवराजसोबत हात मिळवला नाही. हेच कारण आहे की, सीएसकेचा संघ यावर्षी अपयशी ठरला.'

एमएस धोनी आणि युवराज सिंग तया दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. निवृत्त होऊन ४ वर्ष होऊनही धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून आयपीएल खेळतोय.

तो आणखी किती वर्ष या संघासाठी खेळणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरु आहे की, धोनी आयपीएलला रामराम करु शकतो. दरम्यान आगामी आयपीएल हंगाम हे त्याचं शेवटचं हंगाम असू शकतं, अशी चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT