rohit sharma funny comment saam tv
Sports

Rohit Sharma: मी जाड होईन पुन्हा...! यशस्वी जैयस्वालने केक भरवताच रोहित शर्माने दिली मजेशीर कमेंट

rohit sharma funny comment yashasvi jaiswal cake: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा नेहमीच आपल्या विनोदी स्वभावामुळे चर्चेत असतो. अलीकडेच एका सेलिब्रेशनदरम्यान यशस्वी जायसवालने रोहितला केक भरवला.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळली गेली. ही सिरीज टीम इंडियाने २-१ ने जिंकली. या सिरीजचा शेवटचा आणि निर्णायक सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये खेळवण्यात आला. एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 9 विकेट्स राखून पराभूत केलं आणि मोठा विजय मिळवला. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये परतले आणि यावेळी खास केक कापून सेलिब्रेशन केलं.

यशस्वी जैयस्वालचा शतकानंतरचं सेलिब्रेशन

भारतासाठी विशाखापट्टणममध्ये शतक ठोकणाऱ्या यशस्वी जायसवालने केक कापला. त्यानंतर त्यांनी विराट कोहलीला केक खायला दिला. त्यानंतर जायसवाल रोहित शर्माला केक भरवण्यासाठी गेला मात्र रोहितने नकार दिला. त्यावेळी रोहितने हसत म्हटलं, "अरे केक नको जाड होईन मी पुन्हा." हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

टेस्ट निवृत्तीनंतर रोहितचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

आयपीएल 2025 नंतर रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. टी20 क्रिकेटमधून त्याने 2024 मध्येच वर्ल्ड कप जिंकल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. वनडे क्रिकेटमध्ये टिकून राहण्यासाठी रोहितने फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे सिरीजपू्र्वी रोहितने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं. त्याने जवळपास 10 किलो वजन कमी केले. हिटमॅन आता पूर्वीपेक्षा खूपच बारीक आणि सडपातळ दिसत होता.

विराट-रोहितचा जबरदस्त फॉर्म

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे सिरीजमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये दिसले. दोघांनाही ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध चांगला खेळ केला. विराटने सिरीजमध्ये 2 शतकं आणि 1 अर्धशतक ठोकत सर्वाधिक 302 रन्स केले. तर रोहित शर्माने 2 अर्धशतकांच्या जोरावर 146 रन्स केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT