Rohit sharma saam tv
Sports

Rohit Sharma: मी निवृत्ती घेतलीये...; मुंबईने रिटेन केल्यानंतर खूश आहे रोहित शर्मा, पाहा काय म्हणतोय हिटमॅन!

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना रिटेन केलंय. यावेळी मुंबईने रिटेन केल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणालाय ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल २०२५ साठीच्या मेगा ऑक्शनपूर्वी गुरुवारी सर्व फ्रेंचाइजींनी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ही यादी बीसीसीआयकडे सोपवण्यात आली आहे. यावेळी सर्वांचं लक्ष असलेल्या मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना रिटेन केलंय. फ्रँचायझीने जसप्रीत बुमराहला सर्वात महागडा खेळाडू म्हणून रिटेन केलंय.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या टीमने 2020 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर गेल्या सिझनमध्ये फ्रँचायझीने हार्दिक पांड्याला टीमचा नवा कर्णधार म्हणून निवडलं. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम पॉईंट्स टेबलवर तळाशी होती. कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतरही रोहितने फ्रँचायझी सोडलेली नाही. त्यामुळे आता आगामी आयपीएलच्या सिझनमध्येही तो खेळताना दिसणार आहे. यावेळी मुंबईने रिटेन केल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणालाय ते पाहूयात.

काय म्हणाला रोहित शर्मा?

मुंबईच्या टीमकडून रिटेन केल्यानंतर रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. रोहितच्या म्हणण्यानुसार, मी खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलीये. त्यामुळे जे टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांना प्राधान्य मिळायला हवे. रिटेन्शनवर रोहित म्हणाला, “मी या फॉरमॅटमधून निवृत्त झालो आहे, त्यामुळे माझ्यासाठी ही जागा योग्य आहे असं मला वाटतं. देशाचं मोठ्या स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना याठिकाणी प्राधान्य मिळायला हवे. यावर माझा विश्वास आहे आणि मी त्यात खूश आहे.”

मुंबईचा कर्णधार कोण?

रिटेन्शनच्या लिस्टसोबत मुंबई इंडियन्सने पुढच्या सिझनसाठी कर्णधाराचं नावही जाहीर केलं आहे. IPL 2025 मध्ये हार्दिक पांड्या टीमचा कर्णधार असेल असे मुंबई टीमने जाहीर केलंय. गेल्या सिझनमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई टीमची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. मात्र मुंबईने पंड्यावरील विश्वास कायम ठेवला आहे.

मुंबई इंडियन्सने कर्णधार हार्दिक पांड्या, टीम इंडियाचा टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा या पाच स्टार खेळाडूंना रिटेन केलं आहे. टीमने संपूर्ण रिटेन्शन पर्स (75 कोटी रुपये) खर्च केलीये. मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहवर 18 कोटी रुपये, भारताचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादववर 16.35 कोटी रुपये, कर्णधार हार्दिक पांड्यावर 16.30 कोटी रुपये आणि रोहित शर्मावर 16.30 कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय टिळक वर्मा यांच्यावर आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Raj Thackeray School: राज ठाकरेंचं शिक्षण दादरच्या या शाळेत झालं आहे

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

SCROLL FOR NEXT