IPL 2025 Purse Update : आयपीएल मेगालिलाव होणार, पण कोणत्या संघाकडे किती पैसे उरले? सर्वाधिक फायदा कुणाला होणार?

IPL 2025 Team Purse : आयपीएल २०२५ साठीच्या मेगालिलावाआधी रिटेंशन लिस्ट अंतिम झाली आहे. १० संघांनी एकूण ४६ खेळाडूंना रिटेन केलंय. आता सर्वात जास्त रक्कम कोणत्या संघाकडे आणि सर्वात कमी रक्कम कोणाकडे शिल्लक राहिली?
आयपीएल मेगालिलाव होणार, पण कोणत्या संघाकडे किती पैसे उरले? सर्वाधिक फायदा कुणाला होणार?
IPL 2025 mega auction saam tv
Published On

आयपीएल २०२५ चा मेगालिलाव इंटरेस्टिंग होणार आहे. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स, चेन्नई सुपरकिंग्ज या तगड्या संघांसह सर्व संघांनी तब्बल ४६ खेळाडूंना रिटेन केलं आहे. पण असे काही संघ आहेत, ज्यांनी आपले दिग्गज खेळाडू रीलीज केले आहेत. रिटेंशननंतर आता मेगालिलावासाठी सर्वाधिक रक्कम पंजाब किंग्जकडे शिल्लक आहे.

पंजाब किंग्ज संघाकडे सर्वाधिक म्हणजे ११० कोटी रुपये शिल्लक आहेत. तर अन्य काही संघांच्या पर्समध्ये ९० कोटी रुपये देखील नाहीत. १२०-१२० कोटी रुपये सर्व संघांकडे होते. आयपीएलच्या मेगालिलावावेळी सर्वात कमी पैसे राजस्थान रॉयल्स संघाकडे असणार आहेत.

ज्या दोन संघांनी प्रत्येकी ६ खेळाडू आपल्याकडे कायम ठेवले आहेत, त्यात राजस्थानचा समावेश आहे. कोलकाता नाइट रायडर्सनेही ६ खेळाडू रिटेन केले आहेत. पण राजस्थानकडे सर्वात कमी पैसे शिल्लक राहिले आहेत.

पंजाब संघाकडे ११०.५ कोटी रुपये आहेत. पंजाबने दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यात एका खेळाडूला साडेपाच कोटी आणि एका खेळाडूवर चार कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे पंजाब किंग्ज हा मेगालिलावात सगळ्या संघांचं गणित बिघडवू शकतो. तर सर्वात कमी रक्कम राजस्थान संघाकडे आहे. त्यांच्याकडे फक्त ४१ कोटी रुपये आहे. त्यांनी ७९ कोटी रुपये खर्चून ६ खेळाडूंना रिटेन केलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे किती कोटी?

नोव्हेंबरच्या अखेरीला मेगालिलाव होईल. पंजाब किंग्जनंतर सर्वाधिक रक्कम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे असेल. आरसीबीने फक्त तीन खेळाडू रिटेन केले आहेत. ते तीन आरटीएम कार्ड वापरू शकतात. दिल्ली कॅपिटल्सकडेही ७३ कोटी रुपये आहेत. तर लखनऊ आणि गुजरातकडे प्रत्येकी ६९ कोटी आहेत. तर उर्वरित संघांकडे ६० कोटींहून अधिक रक्कम शिल्लक नाही.

आयपीएल मेगालिलाव होणार, पण कोणत्या संघाकडे किती पैसे उरले? सर्वाधिक फायदा कुणाला होणार?
IPL Retention 2025 : मुंबई इंडियन्सनं कुणाला रिटेन केलं? रोहित शर्मा, हार्दिक पंड्याचं काय झालं? पाहा सर्व आयपीएल संघांच्या खेळाडूंची यादी

कोणत्या संघाकडे किती रक्कम?

पंजाब किंग्ज - ११०.५ कोटी रुपये

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - ८३ कोटी रुपये

दिल्ली कॅपिटल्स - ७३ कोटी रुपये

लखनऊ सुपर जायंट्स - ६९ कोटी

गुजरात टायटन्स - ६९ कोटी

चेन्नई सुपर किंग्ज - ५५ कोटी रुपये

कोलकाता नाइट रायडर्स - ५१ कोटी रुपये

सनरायजर्स हैदराबाद - ४५ कोटी रुपये

मुंबई इंडियन्स - ४५ कोटी रुपये

राजस्थान रॉयल्स - ४१ कोटी रुपये

आयपीएल मेगालिलाव होणार, पण कोणत्या संघाकडे किती पैसे उरले? सर्वाधिक फायदा कुणाला होणार?
IPL Retention 2025: KL Rahul ते Rishabh Pant; या स्टार खेळाडूंना फ्रेंचायझी करु शकतात रिलीझ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com