icc odi world cup 2023 saam tv
क्रीडा

ODI World Cup 2023: वर्ल्डकपचं वेळापत्रक पुन्हा बदलणार? हैदराबाद क्रिकेट असोसियशनच्या मागणीवर BCCI उपाध्यक्षांचं मोठं विधान

Ankush Dhavre

Rajiv Shukla On World Cup 2023 Time table:

भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. येत्या ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी हैदराबाद क्रिकेट असोसियशनने सुरक्षेच्या कारणास्तव वेळापत्रकातील सामन्यांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये ९ आणि १० ऑक्टोबर रोजी सलग २ सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. ही मागणी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी फेटाळून लावली आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला स्पष्ट केलं आहे की, जूनमध्ये जाहिर करण्यात आलेल्या वेळापत्रकातील ९ सामन्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. ज्यात भारत- पाकिस्तान सामन्याचा देखील समावेश आहे. हैदराबाद क्रिकेट असोशियनने म्हटले आहे की, सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही सामन्यांमध्ये कमीत कमा एक दिवसाचा तरी गॅप हवा.

राजीव शुक्ला यांनी म्हटले की, 'आगामी वर्ल्डकपसाठी हैदराबादच्या मैदानाची जबाबदारी माझ्याकडे आहे. काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा मी नक्कीच विचार करेन. वर्ल्डकपचं वेळापत्रक बदलनं मुळीच सोपं नाही. तसं होण्याची शक्यता कमी आहे. वेळापत्रक बदलनं केवळ बीसीसीआयच्या हातात नाही. यात आयसीसीचा देखील समावेश असतो. (Latest sports updates)

आगमी वर्ल्डकप स्पर्धेसाठी जून महिन्यात वेळापत्रक जाहिर करण्यात आले होते. त्यानंतर या महिन्याच्या सुरूवातीलाच बीसीसीआय आणि आयसीसीने या स्पर्धेतील ९ सामन्यांचे वेळापत्रक बदलले होते. ज्यात भारत- पाकिस्तान सामन्याचा देखील समावेश होता. यापूर्वी हा सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार होता. आता हो सामना १४ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. हा सामना देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT