hardik pandya and ms dhoni saam tv
Sports

CSK Vs GT IPL Final Weather Report: IPL चा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास कसा लावला जाईल विजेत्या संघाचा निकाल?

Ahmedabad Weather Today: जर या सामन्यात पाऊस पडला तर विजेता संघ कसा निवडला जाईल? जाणून घ्या.

Ankush Dhavre

CSK Vs GT IPL Final, Weather Forecast: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि ४ वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज संघ आमने सामने येणार आहेत.

ज्या क्षणाची कोट्यवधी क्रिकेट चाहते वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. मात्र पाऊस या सामन्यात अडथळा निर्माण करू शकतो. दरम्यान जर या सामन्यात पाऊस पडला तर विजेता संघ कसा निवडला जाईल? जाणून घ्या.

अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता..

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. ॲक्यूवेदरच्या रिपोर्टनुसार अहमदाबादमध्ये संध्याकाळी ७ ते ९ दरम्यान पाऊस पडू शकतो. पाऊस पडण्याची शक्यता ४९ टक्के इतकी आहे.

तर सामना जस जसा पुढे जाईल तशी ही शक्यता ६४ टक्के इतकी होणार आहे. भारतीय हवामान विभागाने असा अंदाज व्यक्त केला आहे की, पाऊस जरी कमी पडला तरी अहमदाबादमध्ये सामना सुरू असताना ढगाळ वातावरण असेल. त्यामुळे पावसामुळे या सामन्यावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (Latest sports updates)

पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण होणार विजेता?

१) सामना सुरू झाला आणि पाहिली इनिंग झाल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये पाऊस पडला तर डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल लावला जाईल.

२) जर एकही चेंडू फेकला गेला नाहीये आणि सामना अजूनही सुरू व्हायचा आहे. असे झाल्यास १२.५० वाजेपर्यंत सुपर ओव्हरचा सामना खेळवला जाईल. असे झाल्यास सुपर ओव्हरच्या साहाय्याने विजेत्या संघाची निवड केली जाईल. (CSK VS GT Weather Report)

३) पाऊस थांबला आणि वेळ शिल्लक असेल तर कमीत कमी ५ ओव्हर्साचा सामना खेळवला जाईल.

४) जर हा सामना आज नाही झाला तर उद्याचा दिवस हा रिझर्व डे असणार आहे.

CSK ला पाचवे तर GT ला दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी..

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी आयपीएल २०२३ स्पर्धेत जोरदार कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्स संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी होता. तर चेन्नई सुपर किंग्ज संघ दुसऱ्या स्थानी होता.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्स संघाला पराभूत करत दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर गुजरात टायटन्स संघाने मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

हा सामना जिंकून गुजरात टायटन्स संघाला सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संध असणार आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला पाचवे जेतेपद मिळवून मुंबई इंडियन्स संघाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Vidyarthini Yojana: लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या सातपूर परिसरातील लैंगिक शोषण प्रकरणात फॉरेन्सिक टीमकडून तपासणी

Akola : अकोल्यात दिवसाढवळ्या गँगवॉर; तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार, पहा थरारक Video

Saffron Benefits in Pregnancy : प्रेग्नंसीत केशर खाल्ल्याने बाळ गोरं होतं का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

SCROLL FOR NEXT