आयपीएल २०२५ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखालीही चेन्नई सुपर किंग्जची टीम 'जैसे थे वैसे'च आहे. टीमची पराभवाची मालिका काही संपत नाहीये. रविवारी रात्री वानखेडे मैदानावर मुंबईने ९ विकेट्सने चेन्नईचा पराभव केला. हा सामना चेन्नईसाठी करो या मरोच्या परिस्थितीचा होता. पॉईंट्स टेबलमध्येही टीम शेवटच्या स्थानावर आहे. मात्र असं असून देखील चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये एन्ट्री घेऊ शकते.
आयपीएलमध्ये अजूनही एक असं समीकरण आहे ज्यामुळे ज्यामुळे सीएसकके प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. चेन्नईसोबत जर एक नंबर गेम चालला तर या टीमसाठी प्लेऑफचे दरवाजे उघडू शकतात. हे समीकरण नेमकं काय आहे पाहूयात.
यंदाच्या सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जने ८ सामने खेळले आहे. ज्यामध्ये टीमला केवळ २ सामन्यांमध्ये विजय मिळवणं शक्य झालं आहे. म्हणजेच ६ सामन्यांमध्ये धोनीच्या सेनेला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोणत्याही टीमला लीग स्टेजमध्ये प्रवेश करण्यासाठी १६ पॉईंट्सची गरज असते. सीएसकेची टीम सध्या पॉईंट्स टेबलला १० क्रमांकावर म्हणजे तळाशी असून रनरेट देखील -1.392 आहे. अजून या टीमला सिझनमधील ६ सामने खेळायचे आहेत.
सध्या सीएसकेचा फॉर्म फारच खराब आहे. मात्र दुसरीकडे या टीमपाशी जगातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. आतापर्यंत धोनीने अनेक असंभव गोष्टी संभव करून दाखवल्या आहेत. त्यामुळे आता या टीमला प्लेऑफ गाठायचं असेल तर एका समीकरणाचा आधार घ्यावा लागणार आहे.
सीएसकेकडे सध्या २ विजयांसह ४ पॉईंट्स आहेत. प्लेऑफ गाठण्यासाठी टीमला १६ पॉईंट्सची गरज आहे. आता सीएसकेला अजून ६ सामने खेळायचे आहेत. जर चेन्नईने या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला तर प्लेऑफचे दरवाजे उघडू शकतात. मात्र यावेळी टीमला प्रत्येक विजय मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. जेणेकरून त्याचा नेट रन-रेटवर चांगला परिणाम दिसून येईल.
आता चेन्नईला ६ सामन्यांपैकी ३ सामने घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकमध्ये खेळायचे आहे. ही त्यांच्यासाठी एक जमेची बाजू असू शकते. मात्र या सिझनमध्ये चेपॉकच्या मैदानावरही चेन्नईला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे येत्या काळात टीम कशी परफॉर्म करते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.