आयपीएल २०२५ आता मध्यावर आली आहे. यामध्ये आता टॉप ४ मध्ये कोणत्या टीम कूच करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दिल्ली कॅपिटल्स पासून पंजाब किंग्स यांच्यामध्ये चुरशीची लढत सुरु आहे. या सिझनमध्ये कोणत्या टीम टॉप ४ मध्ये एन्ट्री करणार याची सर्वांना उत्सुकता आहे. मात्र याचे काही नियम आहेत. पॉईंट्स सोबत प्रत्येक टीमचं नेट रनरेट देखील गेम चेंजर असणार आहे.
जर सध्याच्या पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर बंगळूरू आणि गुजरात टायटन्स या ४ टीम्स टॉपवर आहेत. त्यामुळे सध्या प्लेऑफसाठी या ४ टीम दावेदार मानल्या जातायत. मात्र अशा परिस्थितीत लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विजयाच्या समीकरणाने गणित बिघडवू शकतात.
दिल्लीच्या टीमने आतापर्यंत या सिझनमध्ये ६ सामने खेळले असून ५ सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवणं शक्य झालं आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात १० पॉईंट्स आहे. पंजाब किंग्सने आतापर्यंत ७ सामने खेळले असून त्यापैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात देखील १० पॉईंट्स आहेत.
गुजरातच्या टीमने ६ पैकी ४ सामने जिंकले असून त्यांचे ८ पॉईंट्स आहे. अशातच आरसीबीने ७ पैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला असून त्यांचेही ८ पॉईंट्स आहे. तर लखनऊ सुपर जाएंट्सच्या खात्यात देखील ८ पॉईंट्स आहेत.
16 पॉईंट्स किंवा 8 विजय मिळवणारी टीम सामान्यपणे प्लेऑफला पोहोचते.
१४ पॉईंट्स किंवा ७ विजय मिळवणाऱ्या टीमची क्वालिफाय होण्याची शक्यता असते. अशामध्ये नेट रन-रेट देखील महत्त्वाचं मानलं जातं.
जर एखाद्या टीमचं नेट रनरेट मजबूत असेल तर १४ पॉईंट्सह देखील क्वालिफाय केलं जाऊ शकतं.
१२ पॉईंट्ससह क्वालिफाय करणं कठीण असतं. अशावेळी दुसऱ्या टीमच्या रिझल्टवर टीमला अवलंबून राहावं लागू शकतं.
यामध्ये टॉप २ च्या टीम क्वालिाफायर १ खेळणार. यामध्ये विजेती टीम थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या दोन्ही टीम्स एलिमिनेटर खेळतील.
क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेली टीम एलिमिनेटरच्या विजेत्या टीमसोबत क्वालिफायर दोन खेळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.