jay shah twitter
क्रीडा

Jay Shah Journey: जय शहा यांची क्रिकेटमध्ये कशी एन्ट्री झाली? पाहा ICC अध्यक्ष पदापर्यंतचा संपूर्ण प्रवास

Jay Shah ICC Chairman: बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. दरम्यान कसा राहिलाय त्यांचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घ्या.

Ankush Dhavre

Jay Shah Becomes Youngest ICC Chairman: गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती की, जय शहा आयसीसीचे नवे अध्यक्ष होणार. अखेर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून बीसीसीआयचं सचिवपद भुषवणारे जय शहा आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम करणार आहेत.

यासह जय शहा हे आयसीसीचे सर्वात युवा अक्ष्यक्ष देखील बनले आहेत. जय शहांनी हे पद स्विकारण्यापूर्वी शरद पवार, जगमोहन डालमिया, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांनी हे पद भुषवलं आहे. जय शहा यांच या पदावर पोहचण्यासाठीचा प्रवास मुळीच सोपा नव्हता.

जय शहा यांच्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात २००९ मध्ये झाली. सुरुवातीला ते सेन्ट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट अहमदाबादमध्ये सदस्य म्हणून काम करायचे. त्यानंतर राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रमुख भूमिका बजावल्यानंतर त्यांची बीसीसीआय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

२०१३ मध्ये त्यांची गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या सह सचिवपदी नियुक्ती झाली. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांची बीसीसीआयच्या फायनान्स आणि मार्कटिंग कमेटी म्हणून निवड झाली. या पदावर ४ वर्ष काम केल्यानंतर त्यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड झाली. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांची एशियन क्रिकेट काऊन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली.

जय शहा यांना २०१९ मध्ये आयसीसीमध्ये एन्ट्री झाली. त्यांची आयसीसीच्या फायनान्स अँड कमर्शियल अफेयर्सच्या कमेटीचं अध्यक्षपद मिळालं. या पदावर त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्यांचा अध्यक्ष पदासाठीचा दावा आणखी मजबूत झाला.

आयसीसी अध्यक्ष म्हणून निवड

जय शहा आयसीसी अध्यक्ष होणार, अशी चर्चा केल्या काही महिन्यांपासून सुरु होती. अखेर मंगळवारी (२७ ऑगस्ट) आयसीसीने शिक्कामोर्तब केलं. आयसीसीचे अध्यक्ष होण्यासाठी ५१ टक्के मतदान असणं गरजेचं आहे. एकूण १६ मतं असतात. मात्र जय शहा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. इथून पुढे २ वर्ष ते हे पद सांभाळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT