WTC Points Table saam tv
Sports

WTC Points Table: इंग्लंडच्या विजयानंतर WTC चं पॉईंट्स टेबल कसं बदललं? पाहा फायनल गाठण्यासाठी कोण-कोण दावेदार?

Latest WTC Points Table 2025: न्यूझीलंडच्या या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये बरेच उलटफेर झाले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सामन्यात किवींचा ८ विकेट्सने पराभव झाला आहे. इंग्लंड टीमच्या विजयात सर्वात मोठा वाटा ब्रायडेन कारसेचा होता. या सामन्यात त्याने एकूण 10 विकेट्स घेतले. दरम्यान न्यूझीलंडच्या या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये बरेच उलटफेर झाले आहेत.

न्यूझीलंडची टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीत असल्याने पहिली टेस्ट गमावल्याने त्यांच्या आशांना मोठा धक्का बसलाय. इंग्लंडच्या या ऐतिहासिक विजयाचा टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीवर काय परिणाम झाला ते पाहूयात.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीतून इंग्लंडची टीम यापूर्वीच बाहेर पडली आहे. इंग्लंड सध्या 43.75 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडच्या पॉईंट्सची टक्केवारी 50 आहे. यावेळी ही टीम चौथ्या स्थानावर कायम आहे. क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात ब्रायडेन कारसेने 10 विकेट्स घेत आणि हॅरी ब्रूकने 171 रन्सची शतकी खेळी करून टीमच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

टीम इंडिया अजूनही टॉपवर

इंग्लंडच्या या विजयाचा भारतावर कोणताही परिणाम झालेला नाहीये. टीम इंडिया अजूनही 61.11 गुणांच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिका श्रीलंकेविरुद्ध 233 रन्सच्या मोठ्या विजयानंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. त्यांची टक्केवारी 59.26 आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा फटका ऑस्ट्रेलियाला बसला आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर घसरली असून त्यांच्या गुणांची टक्केवारी 57.69 आहे. न्यूझीलंड चौथ्या आणि श्रीलंका संघ पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका टीमना दिलासा मिळालाय. कारण त्यामुळे त्यांच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा वाढल्या आहेत. याशिवाय न्यूझीलंडने या टेस्ट सिरीजमधील पुढील दोन सामने गमावले तर किवी अंतिम फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT