cameron green saam tv news
Sports

AUS vs WI: कोरोना असूनही कॅमरुन ग्रीन खेळायला कसा उतरला? काय सांगतो ICC चा नियम?

Cameron Green Corona: वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत ग्रीन कोरोना असूनही मैदानावर उतरला आहे.

Ankush Dhavre

Cameron Green Playing Despite Of Corona Positive:

वेस्टइंडिजचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघामध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना गाबाच्या मैदानावर सुरु आहे. दरम्यान या सामन्याच्या सुरुवातीलाच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीनला कोरोनाची लागण झाली असून तो हा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. कोरोना असतानाही त्याला हा सामना खेळण्याची संधी कशी मिळाली? काय सांगतो आयसीसीचा नियम? जाणून घ्या.

या सामन्यात वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर जेव्हा दोन्ही संघातील खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानावर आले त्यावेळी कॅमरुन ग्रीन देखील मैदानावर आले होते.

मात्र ग्रीन इतर खेळाडूंपासून दूर उभा होता. हे पाहुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बुधवारी कॅमरुन ग्रीन कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. तो अजुनही पूर्णपणे बरा होऊ शकलेला नाही. कॅमरुन ग्रीनच्या आधी ट्रेविस हेडला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. (Cricket News In Marathi)

काय सांगतो नियम?

आयसीसीच्या नियमानूसार, तो कोरोना असतानाही सामना खेळू शकतो. मात्र संपूर्ण सामन्यात त्याला सोशल डिस्टंटिंगचं पालन करावं लागेल. तो या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीही करु शकतो.

मात्र त्याला चेंडू हातात घेऊन फुक मारण्याची आणि चेंडूला शाईन करण्याची अनुमती नसेल. जेव्हा जेव्हा चेंडू त्याच्याकडे जाईल तेव्हा चेंडू सॅनिटाईज केला जाईल. संपूर्ण सामन्यादरम्यान तो कुठल्याही खेळाडूसोबत हात मिळवू शकणार नाही. इतकच नव्हे तर विकेट घेतल्यानंतर तो इतर खेळाडूंसोबत जल्लोषही करु शकणार नाही.

या सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:

उस्मान ख्वाजा, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरन ग्रीन, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नाथन लायन, जोश हेजलवुड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT