paralympics saam tv
Sports

Paralympics History: पॅरालिम्पिक्स स्पर्धेची सुरुवात का अन् कशी झाली? वाचा भन्नाट स्टोरी

Why And When Paralympics Started: पॅरालिम्पिक्स स्पर्धेची सुरुवात का अन् कशी झाली? वाचा काय आहे यामागचा इतिहास.

Ankush Dhavre

काही दिवसांपूर्वी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसून आले होते. या स्पर्धेत भारतातील एकूण ११७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

यादरम्यान भारतीय खेळाडूंना ६ पदकं जिंकण्यात यश आलं. आता पॅरिसमध्येच पॅरालिम्पिक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. दरम्यान या स्पर्धेला सुरुवात केव्हा झाली? ही स्पर्धा सुरु होण्यामागचा इतिहास काय आहे? जाणून घ्या.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात

पॅरिसमध्ये पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा २८ ऑगस्टला सुरु होणार असून ८ सप्टेंबर रोजी समाप्त होणार आहे. या स्पर्धेत १७० देशातील ४००० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. दरम्यान भारताकडून ८४ खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

काय आहे स्पर्धेचा इतिहास? (When Paralympics Started)

पॅरालिम्पिक स्पर्धेची सुरुवात १९४८ मध्ये झाली. ही स्पर्धा पहिल्यांदा इंग्लंडमध्ये खेळवण्यात आली. जे सैनिक दुसऱ्या महायुद्धात जखमी झाले होते, त्यांना पुनर्वसनाचा एक मार्ग म्हणून ही स्पर्धा भरवण्यात आली होती. ही भन्नाट कल्पना डॉक्टर लुडविग गुट्टमन यांनी मांडली होती. लुडविग गुट्टमन यांनी स्पाइनल इंज्युरी युनिटच्या रुग्णांसाठी इंग्लंडमधील स्टोक मँडेविल रुग्णालयात क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेला स्टोक मँडेविल गेम्स असे नाव देण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार

ही स्पर्धा केवळ एका देशापूर्ती मर्यादीत होती. त्यानंतर ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचली. ४ वर्षांनंतर म्हणजेच १९५२ मध्ये आणखी २ देशातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामुळे या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्टोक मँडेव्हिल गेम्स असे नाव देण्यात आले होते.

पॅरालिम्पिक्स स्पर्धा सुरु करण्याचा काय फायदा झाला ?

दुसरे महायुद्ध झाल्यानंतर अनेक सैनिक जखमी झाले होते. अनेकांना अपंगत्व आले होते. त्यांच्या पुनर्वसनासाठी ही भन्नाट कल्पना ठरली. अपंगत्व असलेल्या व्यक्तींना क्रीडा कौशल्यांची ओळख पटवून देणे आणि त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणे हे यामागचे प्रमुख उद्धेश्य होते. ज्या खेळाडूंना अपंगत्व आहे, अशा खेळाडूंनाही मैदानात उतरुण आपलं कौशल्य दाखवता यावं, हे देखील ही स्पर्धा सुरु करण्यामागचं प्रमुख उद्देश्य होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT