ENGLAND WOMENS CRICKET TEAM TWITTER
क्रीडा

ENG-W vs IRE-W: इंग्लंडने सामना गमावूनही इतिहास रचला! क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

Ankush Dhavre

England Womens Team Creates History: इंग्लंडचा महिला संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या वनडे मालिकेत इंग्लंडने २-१ ने बाजी मारली होती. आता टी -२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडने इंग्लंडला दणका देत शानदार विजयाची नोंद केली आहे. मात्र हा सामना गमावूनही इंग्लंडच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

इंग्लंडने रचला इतिहास

इंग्लंडचा महिला संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पहिलाच संघ ठरला आहे, ज्या संघाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ६०० सामने पूर्ण केले आहेत. या यादीत इंग्लंडचा संघ अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.

भारतीय संघ कितव्या स्थानी?

इंग्लंडच्या महिला संघाबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने २०२ टी -२० आणि ३९८ वनडे सामने खेळले आहेत. हे दोन्ही मिळून त्यांनी ६०० सामने खेळले आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडने ५५८ सामने खेळले आहेत. ज्यात १७३ टी -२० आणि ३८५ वनडे सामन्यांचा समावेश आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा महिला संघ तिसऱ्या स्थानी आहे. या संघाने ५५६ सामने खेळले आहेत.

भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय महिला संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे. भारतीय महिला संघाने आतापर्यंत ५०२ आमने खेळले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पाचव्या स्थानी आहे. या संघाने ४०३ सामने खेळले आहेत.

येत्या काही महिन्यात टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ कसून सराव करतोय. याच स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा संघ आयर्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Cancelled: पुण्यातून धावणाऱ्या तब्बल १० रेल्वेगाड्या रद्द; अनेकांचे मार्ग बदलले; कारण काय?

Mahalakshmi Yog: ३ दिवसांनी बनणार पॉवरफुल महालक्ष्मी योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Maharashtra News Live Updates : धनगर आंदोलनाचे पडसाद, पुणे- इंदापूर महामार्ग रोखला

Navra Mazha Navsacha 2 Collection: सुप्रिया-सचिन अन् अशोम मामांची जोडी बॉक्स ऑफिसवर गाजली; 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Vande Bharat Express : नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतचं वेळापत्रक काय? कोणत्या मार्गावर धावणार, कुठे किती वेळ थांबते? घ्या जाणून

SCROLL FOR NEXT