ENGW vs IREW: आयर्लंडचा इंग्लंडला दणका! गेल्या 23 वर्षांत पहिल्यांदाच झाला हा रेकॉर्ड
IRELAND CRICKET TEAMTWITTER

ENGW vs IREW: आयर्लंडचा इंग्लंडला दणका! गेल्या 23 वर्षांत पहिल्यांदाच झाला हा रेकॉर्ड

Ireland Beat England In ENGW vs IREW 3rd ODI: इंग्लंड आणि आयर्लंड यांच्याच झालेल्या सामन्यात आयर्लंडने इंग्लंडला पराभूत केलं आहे.
Published on

England Womens vs Ireland Womens Match Result: इंग्लंड महिला आणि आयर्लंड महिला संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. या दौऱ्यावर इंग्लंडला ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. वनडे मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडने आयर्लंडला धूळ चारली आणि २-० ने विजयी आघाडी घेतली.

गेल्या सामन्यात इंग्लंडने इतिहास रचत आयर्लंडवर २७५ धावांनी विजय मिळवला. दरम्यान तिसऱ्या सामन्यात आयर्लंडने दमदार कामगिरी करत इंग्लंडला दणका दिला आहे. या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पावसाने अडथळा निर्माण केलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव २०.५ षटकात १५३ धावांवर आटोपला. डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २२ षटकात १५५ धावा करायच्या होत्या. हे आव्हान आयर्लंडने सहज पूर्ण केलं. यासह इंग्लंड संघाच्या नावे लज्जास्पद विक्रमाची नोंद झाली आहे. इंग्लडचा संघ २००१ नंतर पहिल्यांदाच कुठल्याही फॉरमॅटमध्ये इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ENGW vs IREW: आयर्लंडचा इंग्लंडला दणका! गेल्या 23 वर्षांत पहिल्यांदाच झाला हा रेकॉर्ड
IND vs BAN: पहिल्याच सामन्यात R Ashwin इतिहास रचणार! दिग्गज गोलंदाजाला मागे सोडणार

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, आयर्लंडने शानदार गोलंदाजी करत इंग्लंडचा डाव १५३ धावांवर हाणून पाडला. त्यानंतर आयर्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १५५ धावांचा पाठलाग करायचा होता. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार गेबी लुईसने संघाला शानदार अर्धशतकी खेळी करत दमदार सुरुवात करून दिली. तर लुईसने ७२ धावांची शानदार खेळी केली. शेवटच्या चेंडूवर डालजेलने चौकार मारला आणि आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

ENGW vs IREW: आयर्लंडचा इंग्लंडला दणका! गेल्या 23 वर्षांत पहिल्यांदाच झाला हा रेकॉर्ड
IND vs BAN, Playing XI: टीम इंडियाची प्लेइंग 11 जवळपास पक्की... रोहित या 5 खेळाडूंना बसवणार

आयर्लंडने यावर्षी दमदार कामगिरी केली आहे. सुरुवातीला त्यांनी मायदेशात खेळताना श्रीलंकेला धूळ चारली आहे. हा श्रीलंकेविरुद्ध कुठल्याही फॉरमॅटमध्ये खेळताना पहिलाच विजय ठरला होता. आता इंग्लंडला २००१ नंतर पहिल्यांदाच पराभूत केलं आहे. आयर्लंडच्या या शानदार कामगिरीनंतर संघातील खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com