Train Cancelled: पुण्यातून धावणाऱ्या तब्बल १० रेल्वेगाड्या रद्द; अनेकांचे मार्ग बदलले; कारण काय?

Pune Train Cancelled: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातून धावणाऱ्या अनेक ट्रेन २३ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
Train Cancelled
Train CancelledSaam Tv
Published On

लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दौंड ते मनमाड स्टेशनदरम्यान असलेल्या राहुरी- पढेगाव स्थानकादरम्यान नॉन इंटरलिंकचे काम होणार आहे. २१ ते २३ सप्टेंबर या काळात पुण्याहून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वेचे मार्ग बदलण्यात आली आहे.

रेल्वेच्या कामामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. या कामामुळे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. त्यामुळे या कालावधी मनमाड किंवा दौंड बाजूला जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.

Train Cancelled
Vande Bharat Train Maharashtra: पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद धावणार वंदे भारत; जाणून घ्या ट्रेनचा वेळ आणि तिकिटांचा दर

शनिवारी म्हणजे आज दादर- साईनगर शिर्डी एक्सप्रेस, निजामाबाद- दौंड, पुणे-हजूरसाहिब नांदेड, हजूरसाबिह नांदेड- पुणे एक्सप्रेस या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर रविवारी पुणे-हरंगुल एक्सप्रेस, हरंगुल-पुणे एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस, दौंड-निजामाबाद,जबलपूर-पुणे विशेष लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवारी पुणे-हरंगुल एक्सप्रेस, पुणे-जबलपूर विशेष ट्रेन या रेल्वे रद्द केल्या आहेत.

Train Cancelled
Vande Bharat Train : छत्रपती संभाजीनगरात बनणार वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स; शेंद्रा एमआयडीसीत ज्युपिटर व्यागोंकाची १०० कोटीची गुंतवणूक

काही ट्रेन रद्द तर काही ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

  • जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस : मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळामार्गे धावेल.

  • पुणे-हजूरसाहिब नांदेड एक्स्प्रेस : दौंड-कुर्डुवाडी-लातूर-परळी वैजनाथ-परभणीमार्गे धावेल.

  • हजूरसाहिब नांदेड-पुणे एक्स्प्रेस : परभणी-परळी वैजनाथ-लातूर-कुर्डुवाडी-दौंडमार्गे धावेल.

  • वास्को दा गामा-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस : पुणे-लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी आणि मनमाडमार्गे धावेल.

  • यशवंतपूर-अहमदाबाद एक्स्प्रेस : दौंड-पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-वसई रोड आणि सुरतमार्गे धावेल.

  • हजरत निजामुद्दीन-हुबळी एक्स्प्रेस : मनमाड - इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळा- पुणे-दौंडमार्गे धावेल.

  • हजरत निजामुद्दीन - वास्को द गामा गोवा एक्स्प्रेस : मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळा-पुणेमार्गे धावेल.

  • निजामाबाद-दौंड : परभणी-परळी वैजनाथ-लातूर-कुर्डुवाडी-दौंडमार्गे धावेल.

  • दौंड-निजामाबाद : दौंड-कुर्डुवाडी-लातूर-परळी वैजनाथ-परभणी मार्गे धावेल.

Train Cancelled
Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com