मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एक भीषण अपघात झाला. भाताण बोगद्याजवळ ट्रक, टँकर आणि कार ही तीन वाहने एकमेकांवर आदळली. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर टँकर भररस्त्यात उलटला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
देवेंद्र सिंग राजपूत असे मृत तरुणाचे नाव असून तो छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड इथला रहिवासी आहे. तर सूरज कुदळे आणि अक्षय पाटील अशी जखमी तरुणांची नावे आहेत. दोघांवरही नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.
महामार्ग पोलीस अपघात रोखण्यासाठी सातत्याने उपाययोजना करीत आहेत. वाहनांच्या वेगमर्यादेवर लक्ष ठेवण्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील अपघाताच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अवजड वाहने लेन सोडून धावत असल्याने अपघात होत असल्याचं समोर आलंय.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भाताण बोगद्याजवळ पुन्हा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. पुणे लेनवर कार, ट्रक आणि टँकर ही तीन वाहने एकमेकांना धडकली. अपघात इतका भीषण होता, की टँकर महामार्गावरच उलटला. तर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.
या अपघातानंतर महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी तरुणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पंचनामा करून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.