paris paralympics twitter
Sports

Paris Paralympics 2024: एकाच दिवशी भारताने जिंकले 8 मेडल्स; पदक तालिकेत कितव्या स्थानी?

India Medals At Paris Paralympics 2024: पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत ८ पदकं जिंकली आहेत. दरम्यान भारतीय संघ पदक तालिकेत कितव्या स्थानी आहे? जाणून घ्या.

Ankush Dhavre

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. या दिवशी भारतीय खेळाडूंनी १,२ नव्हे तर तब्बल ८ पदकं पटकावली. ज्यात २ सुवर्ण पदकांचा समावेश होता. बॅडमिंटनपटू नितीश कुमारने सुवर्ण, तर भालाफेकपटू सुमित अंतीलने सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदकावर नाव कोरलं.

यासह भारतीय खेळाडूंनी ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकावर निशाणा साधला. यापूर्वी कधीच भारतीय खेळाडूंनी एकाच दिवशी इतकी पदकं जिंकली नव्हती. एकूण १५ पदकांसह भारत १५ व्या स्थानी आहे.

भारतासाठी ऐतिहासिक दिवस

दिवसाची सुरुवात रौप्य पदकाने झाली. योगेश कथूनियाने थाळीफेक F56 प्रकारात रौप्य पदक जिंकलं. त्यानंतर बॅडमिंटन एकेरी SL3 प्रकारात सुवर्ण पदकावर नाव कोरलं. हे या स्पर्धेतील भारतचं दुसरं सुवर्ण पदक ठरलं आहे.

बॅडमिंटनमध्ये पदकांचा पाऊस

महिलांच्या बॅडमिंटन एकेरी SU5 प्रकारात मनीषा रामदासने कांस्य पदकाला गवसणी घातली. तर तुलसीमती मुरुगेसनने रौप्य पदकाला गवसणी घातली. त्यानंतर पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीत SL4 प्रकारात सुहास यथिराजने रौप्य पदकाला गवसणी घातली.

भारत कितव्या स्थानी ?

भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिलने भालाफेक F64 प्रकारात भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं. हे या स्पर्धेतील भारताचे तिसरे तर या दिवसातील दुसरे सुवर्ण पदक ठरले. त्यानंतर तिरंदाजीमध्ये मिस्क टीम कंपाऊंड इव्हेंटमध्ये भारतीय तिरंदाज शीतल देवी आणि राकेश कुमारने कांस्यपदकवर निशाणा साधला.

तर नित्या श्रीने महिलांच्या SH6 प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली. भारताने एकाच दिवशी ८ पदकांची कमाई केली आहे. पदकतालिकेबद्दल बोलायचं झालं, तर भारत या यादीत १५ व्या स्थानी आहे.

तर भारताने आतापर्यंत ३ सुवर्णपदकं पटकावली आहेत. तर ५ रौप्य आणि ७ कांस्यपदकं पटकावली आहेत. दरम्यान ८७ पदकांसह चीन अव्वल स्थानी आहे. तर ५४ पदकांसह चीन दुसऱ्या स्थानी आणि ४२ पदकांसह ग्रेट ब्रिटन तिसऱ्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT