आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सामना काल, बुधवारी झाला. या सामन्यात विराट कोहली अवघ्या सात धावांवर आऊट झाला. त्यामुळं चिडलेल्या चाहत्यांनी चुकून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्यावर हल्ला चढवला. कोहलीला गुजरातचा गोलंदाज अरशद खान यानं बाद केलं. पण नामसाधर्म्य असल्यानं चिडलेल्या चाहत्यांनी चुकून अरशद वारसीच्या सोशल मीडिया हँडलवर कमेंट्स करण्यास सुरुवात केली. अभिनेता अजय देवगणबद्दल त्यानं लिहिलेल्या पोस्टवर जाऊन कमेंट करण्यास सुरुवात केली.
क्रिकेटचं भूत चाहत्यांवर चढतं तेव्हा त्यापासून कुणीच वाचू शकत नाही, याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. गुजरात टायटन्सचा युवा गोलंदाज अरशद खान यानं स्टार फलंदाज विराट कोहली ७ धावांवर खेळत असताना बाद केलं. त्यावर बेंगळुरू आणि विराटचे चाहते भलतेच संतापले.
विराट कोहली बाद झाल्यानंतर त्याचे चाहते अरशद खानला ट्रोल करण्यासाठी सोशल मीडियावर गेले. पण अरशद खानऐवजी बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीत त्यांच्या तडाख्यात सापडला. अरशद वारसीच्या प्रोफाइलवर जाऊन त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. विराटची विकेट घेतल्यानं चाहत्यांची सटकली आणि त्यांनी सर्किटलाच ट्रोल केलं.
मुन्नाभाई एमबीबीएसमधील सर्किटच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला. सोशल मीडियावर एका यूजरनं तर त्याला धमकीच दिली. तुला बघून घेतो, अशी कमेंट केली. तर अनेक चाहत्यांनी राग देणाऱ्या इमोटिकॉन्स टाकल्या. ये सर्किट तू कोहलीची विकेट का घेतली? असा जाबच एकानं विचारला.
हा विजय गुजरातसाठी महत्वपूर्ण ठरला. या विजयासह गुजरात गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर बेंगळुरूला या मोसमातल्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळं गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानी आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.