highest team total to most sixes in odi know records made in india vs australia 2nd odi at indore holkar stadium Saam tv news
Sports

IND vs AUS,2nd ODI Records: सर्वात मोठी धावसंख्या ते सर्वाधिक षटकार; इंदुरच्या मैदानावर मोडले गेले हे मोठे रेकॉर्ड्स

India vs Australia 2nd ODI Records: या सामन्यात अनेक मोठे रेकॉर्ड्स मोडले गेले आहेत.

Ankush Dhavre

India vs Australia 2nd ODI Records:

इंदूरच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या वनडे सामन्याचा थरार पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत ९९ धावांनी (डकवर्थ लुईस नियमानुसार) विजय मिळवला आहे.

या सामन्यात भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. या विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान अनेक मोठ मोठे रेकॉर्ड बनवले आणि मोडले गेले आहेत. पाहा रेकॉर्डची संपूर्ण यादी.

एकाच डावात १८ षटकार..

भारतीय संघातील फलंदाजांनी या डावात एकूण १८ षटकार मारले आहेत. यासह भारतीय संघ वनडेत सर्वाधिक षटकार मारणारा पहिलाच संघ ठरला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ३००० षटकार मारले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना चौथी सर्वात मोठी धावसंख्या...

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात मोठी धावसंख्या करणारा चौथा संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सर्वात मोठी धावसंख्या करण्याचा विक्रम हा इंग्लंडच्या नावे आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ४८१ धावा केल्या होत्या. तर आता भारतीय संघाने ३९९ धावांचा डोंगर उभारला आहे. (Latest sports updates)

वनडेत संयुक्तरित्या सर्वात महागडं षटक..

भारतीय संघातील फलंदाजांनी कॅमेरून ग्रीनचा चांगलाच समाचार घेतला. सूर्यकुमार यादवने कॅमेरून ग्रीनच्या एकाच षटकात २६ धावा ठोकल्या. यादरम्यान त्याने सलग ४ षटकार मारले. यापूर्वी साईमन डेव्हिसने इंग्लंडविरुद्ध खेळताना २६ धावा खर्च केल्या होत्या. हे वनडेतील महागडे षटक ठरले होते.

भारतीय संघाविरुद्ध खेळताना सर्वात महागडा गोलंदाज..

कॅमेरून ग्रीन हा भारतीय संघाविरुद्ध खेळताना सर्वात महागडी स्पेल टाकणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. ग्रीनने १० षटक गोलंदाजी करत १०३ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने २ फलंदाजांना माघारी धाडलं. भारतीय संघाविरुद्ध खेळताना सर्वात महागडी स्पेल टाकण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेचा गोलंदाज नुवान प्रदीपच्या नावे आहे. त्याने १०६ धावा खर्च केल्या होत्या. टीम साउदी या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने १०५ धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलचं “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

SCROLL FOR NEXT